श्री. संत बेंडोजी महाराजांच्या पालखीवर वरूणराजाची हजेरी – लाखो वर्षांची वरूणराजाची परंपरा कायम

0
632
Google search engine
Google search engine

आषाढी एकादशीनिमित्य घुईखेडात दर्शानासाठी लाखो भाविकांची मांदीआळी

 

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )


विदर्भ प्रांतातील एकमेव असलेली श्री. संत बेंडोजी महाराज संजीवण समाधी, श्री क्षेत्र घुईखेड येथे आषाढी एकादशीनिमित्य लाखो भाविकांनी मोठ्या श्रध्देने दर्शन घेतले.

 


देवयानी आषाढी एकादशी ही एका प्रकारची तालुक्यातील भावीक भक्तांकरीता अलौकीकच ठरत आहे. लाखो वर्षांपासुन चालत आलेली ही परंपरा आजही कायम आहे. श्री. संत बेंडोजी महाराजांची पालखी मंदिराच्या बाहेर निघताच पावसाला सुरूवात होते. या क्षणाला पाहण्याकरीता लाखो भावीक श्री. क्षेत्र घुईखेड येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरूण राजाची हजेरी ही आपल्या दैवता करीता लाखो वर्षाची परंपरा कायम ठेवत त्याने आपली हजेरी लावली. हा क्षण पाहण्यासाठी व दैवतांचे दर्शन घेण्यासाठी गावातील प्रथेनुसार विशेषत: नवविवाहीत मुली तसेच बाहेरगावी कामानिमित्य राहणारे घुईखेडवासी या दिवशी गावात परत आले होते. श्री. संत बेंडोजी महाराजांची पालखी एकादशीच्या दिवशी सायंकाळी ५ वाजता मंदिराच्या बाहेर प्रवेश करून नागपुर- औरंगाबाद एक्सप्रेस हायवेवरून जाऊन चंद्रभागा नदीच्या पात्रामध्ये परंपरेनुसार आरती करण्यात आली. घुईखेड गावाच्या प्रदक्षिणा करून परत मंदिरामध्ये आगमन झाले. परीसरात महाराजांची मिरवणुक काढण्यात आली होती. यामध्ये वारकरी संप्रदाय मंडळींनी मृदुंगांच्या तालावर पावली तसेच फुगडी केली. यानंतर शेवटी ६.३०  वाजता बेंडोजी महाराजांच्या आरतीला सुरूवात होऊन या अलौकीक सोहळ्याची समाप्ती झाली. यावेळी ह.भ.प. निवृत्तीनाथ गोळे महाराज, ह.भ.प. गावंडे महाराज, ह.भ.प. खुशाल गोडबोले, ह.भ.प. सतिष भुंबर, सौ. निर्मलाबाई हेले, बबनराव कोठाडे, डॉ. धोटे, मधुकरराव चोपदार, संजीवराव भोरे, विश्वेश्वरराव गावंडे, पांडुरंग भोयर, तुळशिराम वैद्य, काशिनाथ लाड, यादवराव येवले, विठ्ठलराव चौधरी, जयकृष्ण येवले, प्रफुल चनेकार, कुणाल सिंगलवार, प्रफुल घड्डीनकर तसेच संस्थानचे ट्रस्टी बाळासाहेब देशमुख, प्रविण घुईखेडकरसह हजारो भाविक  उपस्थित होते.