चांदूर न.प.मध्ये एलईडी स्ट्रिट लाईट घोटाळा झाल्याचे उच्च न्यायालयात निष्पन्न

0
736

विभागीय आयुक्तांनी चौकशी करून ३ महिण्यात निकाल देण्याचे कोर्टाचे आदेश
माजी आमदार स्व.डॉ.पांडुरंग ढोले,नितीन गवळी सह तिसऱ्या  आघाडीच्या प्रयत्नांना यश

चांदूर रेल्वे / शहेजाद खान –

चांदूर रेल्वे नगर परिषदेने व तत्कालीन काँग्रेस सत्ताधाऱ्यानि  शहरात ३४८ एलईडी स्ट्रिट लाईटचा
बसविण्याचा कंत्राट  लाईट तब्ब्ल १४ हजारात खरेदी करून
चक्क ३६ लाखाचा घोटाळा केल्याची लेखी तक्रार तिसऱ्या आघाडीने अमरावती जिल्हाधिकाऱ्यासह मंत्रालयात केली होती. या प्रकरणी शासन व प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने तिसऱ्या आघाडीच्या
वतीने माजी आमदार स्व.डॉ.पांडुरंग ढोले, नितीन गवळी यांनी नागपूर उच्च न्यायालयात जनहित याचीका
दाखल केली. उच्च न्यायालयाने दोन्ही बाजुचे म्हणणे एकूण या प्रकरणात घोटाळा झाल्याचे मान्य केले
व या प्रकरणाची चौकशी करून तीन महिण्यात निकाल देण्याचे आदेश अमरावती विभागीय आयुक्तांना
दिले असल्याची माहिती चांदूर रेल्वे येथील तिसऱ्या आघाडीने स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार
परिषदेत दिली.
माजी आमदार स्व.डॉ.पांडुरंग ढोले यांचे मार्गदर्शन व प्रयत्नामूळे हा न्यायालयीन विजय मिळाल्याचे

तिसऱ्या  आघाडीचे नितीन गवळी यांनी पत्र परिषदेच्या प्रारंभी सांगीतले. पुढे बोलतांना नितीन गवळी यांनी
चांदूर रेल्वे नगर परिषदेने एलईडी स्ट्रिट लाईट कंत्राट देतांना एका एलईडी स्ट्रिट लाईटचे बाजार भाव ४हजार असतांना प्रति नग चक्क १४ हजार रूपयाला मंजुरात दिली. ही बाब तिसऱ्या आघाडीने
न.प.प्रशासनाच्या लक्षात आनुन दिली. मात्र त्यावर नगरपालीकेने साफ दुर्लक्ष केले. त्यामूळे तिसऱ्या आघाडीने या घोटाळ्याची तक्रार दि.२०/०७/१५ ला न.प.अ‍ॅक्ट १९६५ अंतर्गत कलम ३०८ अन्वये
जिल्हाधिकाऱ्याकडे  केली. त्यावर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यायांने स्थगिती देत या कामासाठी काही संस्था
स्वतः गुंतवणूक करून कामे करतात व एलईडी लाईटमूळे विजेची बचत होऊन त्यातून त्या संस्थेला परतफेड
करता येते असा आदेश दिला. या प्रकरणाची राज्यमंत्र्याकडे सुनावनी झाली. मात्र तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यायाने कोणताही अंतिम आदेश पारीत न झाल्याचे कारण देत त्यावरील स्थगिती उठवली. या
प्रकरणात जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी  यांनी सावजनिक हित संबध जपने कर्तव्य होते. याचिकाकत्र्यांनी
दिलेल्या एलईडी लाईट च्या कोटेशनची चौकशी करून काय दर आहे याची माहिती घ्यायला हवे होते.तसेच
एलईडी लाईटच्या वाढीव दराकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केले.या बाबी व सार्वजनिक हिताचे सर्व उपाय टाळल्या
गेल्याचे कोर्टाने सुनावले. या प्रकरणात दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकुन याचिकाकर्ते तिसऱ्या आघाडीच्या
बाजुने निकाल देत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून ३ महिण्यात प्रकरण निकाली काढण्याचे आदेश
अमरावती विभागीय आयुक्तांना उच्च न्यायालय नागपूर खंड पिठाने दिल्याची माहिती नितीन गवळी यांनी
दिली.यावेळी मेहमूद हुसेन, कॉ.विनोद जोशी, बंडु यादव, कॉ.रामदास कारमोरे, राजाभाऊ भैसे, सुधीर
सव्वालाखे, कमलकिशोर पनपालीया, धर्मराज वरघट, अंबादास हरणे, संजय डगवार, प्रा.विजय रोडगे,
अरूण बेलसरे, महादेव शेंद्रे, भीमराव खलाटे, संजय आंबटकर, विनोद लहाने, अजय चुने, उमेश मडावी,
चेतन खुने सह तिसऱ्या आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.