​*सायबर क्राईम व प्रतिसाद अँप बद्दल रहमानीया कनिष्ठ महाविद्यालयात ठाणेदार अचलपूर यांचे मार्गदर्शन*

0
601
Google search engine
Google search engine

अचलपूर  / श्री प्रमोद नैकेले/-

 मोबाईल व व्हाट्सअप चा वाढता उपयोग यामुळे सायबर क्राईम मध्ये होत असलेल्या प्रकाराबाबत अचलपूर पोलिस स्टेशन चे ठाणेदार आधारसींग सोनोने यांनी स्थानिक रहमानीया कनिष्ठ महाविद्यालयात सविस्तर माहिती दिली.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य आदिल रशीद यांनी प्रमुख उपस्थित प्राचार्य राष्ट्रीय महाविद्यालय प्रमोद नैकेले,सामाजिक कार्यकर्ता डाँ.निलेश खंडेलवाल,पत्रकार अझरूद्दीन व फीरोजखान यांचे स्वागत केले.यावेळी बोलतांना ठाणेदार सोनोने यांनी मोबाईल व व्हाटस अप वापरतांना घ्यायची काळजी बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कोणत्याही पोष्ट टाकतांना विचार करून टाकाव्यात कारण यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या तर अजामीनपात्र गुन्हा दाखल होतो व त्यामुळे शिक्षा सुध्दा होते.

धार्मिक,राजकीय किंवा जातीय संदेश टाकू नये अथवा लाईक,करून शेअर करू नये.तसेच प्रोफाईल फोटो सुध्दा अडचणीत आणू शकतात त्यावर विशेषता मुलींनी काळजी घ्यावी.फेसबुक चा वापर चांगल्या गोष्टी करिता करावा.पोलिस विभागातर्फे एक अँप तयार करण्यात आले त्याचे नाव प्रतिसाद अँप आहे आपल्या मोबाईल वरील प्लेस्टोअर मध्ये जाऊन डाउनलोड करून घ्यावे व कोणत्याही अडचणीत असल्यास केवळ एका संदेशावर जवळपास च्या पोलिस स्टेशन चे अधिकारी आपल्या मदतीला येतील.अचलपूर मधील रहदारी बाबत त्यांनी चिंता व्यक्त करून रस्ता ओलांडत असतांना काळजी घ्यावी तसेच विना परवाना वाहन चालवणे गुन्हा आहे.आपल्या सुरक्षेकरीता पोलीस आहेत पण आपण जर बेकायदेशीर वागलात तर कायद्याने कारवाई सुध्दा पोलिस करतील असे प्रतिपादन त्यांनी केले.कार्यक्रमाला विद्यार्थी व सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.