अरे पावसा, पावसा तु आहेस तरी कुठं ? पावसाने दांडी मारल्याने शेतकरी हवालदिल ५०% शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

0
840
Google search engine
Google search engine

शासनाने पेरण्यांसाठी खते – बियाने मोफत द्यावे – शेतकरी

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )-

 

 

पावसाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी होत आला असुन तालुक्यात सद्या तरी खुपच कमी पाऊस पडला आहे. तरीही शेतकऱ्यांनी लगबगीने ९० ते ९५ टक्के पेरण्या आटोपल्या असुन मृग नक्षत्रानंतर तालुक्यात कुठत्या भागात कमि तर कुठल्या भागात जास्त पाऊस पडला आहे. गेल्या २६ जुननंतर पावसाने दांडी मारल्याने शेतकरी फारच हवालदिल झाला असुन अर्ध्याअधिक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आल्यामुळे या शेतकऱ्यांना शासनाने मोफत खते व बियाने उपलब्ध करून द्यावे अशी मागणी होत आहे.
अगोदरच कर्जापायी जर्जर झालेला शेतकरी त्यातच सोयाबीन, तुरीला भाव नाही. नाफेडमध्ये विकलेल्या तुरीचे पैसे मिळाले नाही. अशातच कृषी केंद्रातुन कसे बसे बि-बियाणे व खते उधार घेऊन पेरणी आटोपल्या. परंतु पुन्हा त्या बळीराजासमोर अस्मानी संकट आवासुन उभे राहले व २६ जुननंतर तालुक्यात पावसाने पुर्णत: दडी मारल्यामुळे व उन्हाळ्यासारखी उन तपत असल्यामुळे तालुक्यातील ५० टक्के पेरण्यांवर  संकट निर्माण झाले आहे. अगोदरच डबघाईस आलेला शेतकरी अशात हे दुबार पेरणीचे संकट त्यातच शासनाच्या कर्जमाफीच्या फसव्या घोषणा व शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा म्हणुन १० हजार रूपये पेरण्यांकरीता देण्याचे जाहीर करूनही कोणतीही रक्कम शेतकऱ्यांना अद्यापही देण्यात आलेली नाही. यामुळे हा बळीराजा पार खचुन गेला असुन शासनाने कर्जमाफी देऊन त्वरीत नविन कर्ज उपलब्ध करून द्यावे, अन्यथा दुबार पेरणींसाठी बि- बियाने, खते व नगदी रक्कम त्वरीत द्यावी अशी मागणी होत आहे..

तालुक्यात पाऊसच नसल्याने शहराला पिण्याचा ८ दिवसाआड पुरवठा

चांदुर रेल्वे शहराला ३० हजार लोकसंख्येला मालखेड धरणातुन पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु वरूणराजाच्या अवकृपेमुळे पाऊसच पडला नसल्यामुळे तलावातील पाणीसाठा खुपच कमी झाला असुन रोज मिळणारे पिण्याचे पाणी आता शहरवासीयांना ८ दिवसाआड मिळत असल्यामुळे शहरात हाहाकार निर्माण झाला आहे. आणि मालखेड तलावात पाणी खुप दुरवरून वाहत येते. परंतु सगळीकडे शेतावर, नद्यांवर बंधारे बांधण्यात आल्यामुळे आता तलावात पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. अशातच अपुरा पाऊस यामुळे जास्तच संकट निर्माण झाले आहे. जर वरूणराजाने तातडीने कृपा केली तर चांदुर रेल्वे शहरवासीयांना पिण्याचे पाणी दररोज मिळेल अन्यता शहरवासीयांसमोर खुप मोठी समस्या निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही..