‘सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आदी हिंदु संघटनांवर बंदी घाला !’ – दक्षिण आशिया अल्पसंख्यांक अधिवक्ता संघटनेची मागणी

0
976
Google search engine
Google search engine

अशी मागणी करणारे कधी जिहादी आतंकवादाविषयी, देशद्रोह्यांविषयी का बोलत नाहीत ?

नवी देहली – येथील इंडियन लॉ इन्स्टिटयूटमध्ये आयोजित एका परिषदेत दक्षिण आशिया अल्पसंख्यांक अधिवक्ता संघटनेने (‘सामला’ने) अल्पसंख्यांकांच्या वाढत्या हत्यांविषयी चिंता व्यक्त केली. तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर बंदी घालण्यासाठी आणि त्यांना आतंकवादी संघटना म्हणून घोषित करण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्यास प्रारंभ करण्याचा ठराव पारित केला आहे. या परिषदेत ‘दलित, अल्पसंख्यांक, आदिवासी यांचे जीवही महत्त्वाचे आहेत’, असे प्रतिपादिले गेले. परिषदेला मोठ्या संख्येने बौद्धिक आणि वंचित समूहातील संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते, असा दावा आयोजकांनी केला आहे. या परिषदेत बजरंग दल, हिंदु युवा वाहिनी, अभिनव भारत, हिंदू सेना, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती या हिंदु संघटनांवर बंदी घालण्यात यावी आणि त्यांना आतंकवादी संघटना म्हणून घोषित करण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्यास प्रारंभ करण्याचा ठराव संमत करण्यात आला. इसाई महासंघाच्या डॉ. अनिता बेंजामिन, पंथक सेवा दलाचे कर्तारसिंग कोचर, उर्दू पत्रकार अलिम नकवी आणि देहली सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हरनाम सिंग या परिषदेला उपस्थित होते.

२. परिषदेला संबोधित करतांना महमूद प्रचा म्हणाले की,  आदिवासी आणि अल्पसंख्यांक यांंची परिस्थिती अमेरिकेतील निग्रोसारखीच आहे. त्यांनी समस्या सोडवण्यासाठी काहीच प्रयत्न न करण्यावरून समाजाच्या नेत्यांवर टीका केली.  प्रचा यांनी परिस्थितीची जाणीव नसल्यावरून न्यायव्यवस्थेवरही टीका केली.