चांदुर रेल्वेतील पत्रकारांवर झालेल्या अन्यायाची ‘आपले सरकार’ पोर्टलवर तक्रार

0
826
Google search engine
Google search engine

तिसऱ्या आघाडीतर्फे नितीन गवळींनी केली तक्रार दाखल



चांदुर रेल्वे -/ शहेजाद खान –
विशिष्ट कालमर्यादेत प्रभावी पध्दतीने नागरीकांच्या तक्रारींचे निवारण करता यावे तसेच नागरीकांच्या सुचना शासनापर्यंत पोहचाव्यात यासाठी मुख्यमंत्री यांच्या कार्यालयाने ‘आपले सरकार’ या पोर्टलची निर्मीती केलेली आहे. या पोर्टलवर चांदुर रेल्वे शहरातील तीन पत्रकारांवर झालेल्या अन्यायाची तक्रार तिसऱ्या आघाडीतर्फे आम आदमी पार्टीचे अमरावती विधानसभा संयोजक नितीन गवळी यांनी केली.
नागरीक आणि प्रशासन यांना ऑनलाईन संवाद साधण्यासाठी सेतु निर्माण करणारा ‘आपले सरकार’ हा शासनाचा महत्वपुर्ण प्रकल्प आहे. राज्यातील नागरीकांना त्यांच्या तक्रारींचे ऑनलाईन पध्दतीने एकाच ठिकाणी निवारण करून  घेण्यासाठी आपले सरकार ही संगणीकृत तक्रार निवारण प्रणाली सुरू करण्यात आली. याच वेबपोर्टलवर तिसऱ्या आघाडीतर्फे आम आदमी पार्टीचे नितीन गवळी यांनी चांदुर रेल्वे येथील तीन पत्रकारांवर झालेल्या अन्यायाची तक्रार दाखल केली आहे. पत्रकार हा निर्भिडपणे लिखाण करुन वाईट प्रवृत्तीचे बुरखे फाडून या प्रवृत्तींना चारचौघात उघडे पाडत असतो. मात्र चांदुर रेल्वे तालुक्यातील मोगरा गावच्या युवतीच्या आत्महत्या प्रकरणाची बातमी संकलीत करण्यास गेलेले स्थानिक पत्रकार प्रशांत कांबळे, अभिजित तिवारी या दोन युवा पत्रकारांवर सुड भावनेने स्थानिक पोलीसांनी अमानुष मारहाण करुन त्यांना अटक केली तसेच पत्रकार गुड्डु शर्मा यांच्यावरही अनेक कलमान्वये गुन्हे दाखल केले.  पत्रकारांवर झालेल्या या अन्यायाची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकारच्या या वेब पोर्टल दाखल केलेल्या तक्रारीवरून पत्रकारांवर झालेल्या अन्यायाची योग्य चौकशी झाली नाही तर मुख्यमंत्री महोदयांनी प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, गतिमान व पारदर्शक होण्यासाठी सुरू केलेल्या या पोर्टलचे दावे फोल ठरणार ऐवढे मात्र नक्की..