असा असेल माउलींचा प्रस्थान सोहळा… !

0
739
Google search engine
Google search engine

आज पहाटे ४ वा. घंटानाद. ४.१५ काकडा. पहाटे ४.१५ ते ५.३० पवमान अभिषेक, पंचामृत पूजा व दुधारती. ५ ते सकाळी ९ पर्यंत भक्तांच्या महापूजा
व समाधी दर्शन.

सकाळी ९ ते १२ पर्यंत भाविकांना समाधीस्थळाचे दर्शन व वीणा मंडपात कीर्तन. दुपारी १२ ते १२.३० गाभारा स्वच्छ करणे, समाधीस पाणी घालणे व श्रींना महानैवेद्य.

 दुपारी १२.३० ते २.३० पर्यंत भाविकांना समाधीचे दर्शन.

दुपारी २.३० ते ३ वाजता प्रस्थान सोहळ्याच्या मानाच्या ४७ दिंड्यांना मुख्य महाद्वारातून प्रवेश. दरम्यान
श्रींना पोशाख घालण्यात येईल.

दुपारी ४ वाजता मुख्य प्रस्थान सोहळ्याला सुरुवात.
श्रीगुरु हैबतबाबा यांच्या तर्फे श्रींची आरती. त्यानंतर संस्थांची आरती, नारळ प्रसाद व विधिवत मानपानाचा कार्यक्रम.

माऊलींचे मानाचे दोन्ही अश्व मंदिरात प्रवेश करतील. विणामंडपात पालखीमध्ये श्रींच्या चल पादुका प्राणप्रतिष्ठापित होईल. दरम्यान संस्थांतर्फे मानकऱ्यांना मानाची पागोटी वाटप करण्यात येईल.
नंतर पालखी महाद्वारातून प्रस्थान ठेऊन प्रदक्षिणा मार्गाने हा सोहळा आजोळघरी (दर्शन मंडप इमारत) पहिल्या मुक्कामी स्थिरावेल.

रात्री ११ ते ४.३० जागर.