संत गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम!

0
1245
Google search engine
Google search engine



महेंद्र महाजन /रिसोड/ वाशिम –

रिसोड – तालुक्यातील मोठेगाव येथील संत गाडगे महाराज माध्य.व  उच्च माध्यमिक विद्यालयाचा कला शाखेचा इयत्ता १२ वी चा  निकाल  ९३ टक्के एवढा  लागला आहे.
व इयत्ता १० वी चा निकाल ८६.१० टक्के लागला आहे .
      यावर्षी २०१६-१७ ला महाविद्यालयातून १२ वी परिक्षेसाठी एकूण ४१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी३८विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले. त्यामध्ये सुनिल एकाडे हा विद्यार्थी ७६.४२ टक्के गुण घेवून महाविद्यालयातून प्रथम आला आहे. तर व्दितीय क्रमांक कु.दिपाली खडसे ही ७४.२०टक्के गुण घेवून, तृतीय क्रमांक शरद जानु पवार ७३.३२गुण घेवून उत्तीर्ण झाले आहेत. तर 32 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत आले आहेत.
        तसेच इयत्ता १० वी साठी २०१६-१७ ला  एकुण ४७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी ४२ विद्यार्थ्यानी परीक्शा दिली व ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
   विद्यालयातुन प्रथम येण्याचा मान कु.अभिलाषा अढागळे हिने पटकावला तिला ८८.९१ एवढे गुण मिळाले.द्वितीय क्रमांक सतिष दत्तराव धांडे याने पटकावला त्याला ७७.४० टक्के गुण व तृतीय क्रमांक उमेश धांडे ७७.२० टक्के गुण घेतले आहेत.
      तसेच ४० उत्तीर्ण विद्यार्थापैकी पहिले  ३ विद्यार्थी हे विशेष प्राविण्य मध्ये उत्तीर्ण झाले. व २२ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले़.व १५ व विद्यार्थी हे द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले .
      ग्रामीण भागातून शिक्षण घेवून प्रथम श्रेणीचे गुण विद्यार्थ्यानी मिळविल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याचे सर्व श्रेय विद्यार्थ्यानी आईवडील व शिक्षक वृंदांना दिले आहे. सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव दत्तराव धांडे, अध्यक्ष नागेश धांडे, प्राचार्य सपकाळ  व शिक्षकांनी अभिनंदन व कौतूक केले.  व त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.      तसेच या कनिष्ठ महाविद्यालयात कला, विज्ञान व क्रॉप सायन्ससाठी  पाल्याला प्रवेश देण्यासाठी पालक पसंती दर्शवित आहेत