​प्रहारने नेली जिल्हा परिषदेत प्रतिकात्मक प्रेतयात्रा – सीईओंना निवेदन

0
778
Google search engine
Google search engine

 

 

अमरावती

चांदुरबाजार तालुक्यातील वनी येथील स्मशानभूमीचे काम वर्कआॅर्डर काढूनही ठप्प असल्याने नागरिकांना प्रेत यात्रा स्मशानात नेण्यासाठी त्रास होत आहे. त्यामुळे प्रहार जनशक्ती संघटनेने आज दुपारी २ वाजताच्या सुमारास प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढुन ती जिल्हा परिषदेत नेली.
वनी ते विश्रोळी रस्त्याचे मंजुर असलेले काम बंद करण्यात आले आहे. सदर काम तातडीने सुरु करण्याची मागणी प्रहार शेतकरी संघटननेचे जिल्हा प्रमुख मंगेश देशमुख यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली होती. परंतु निवेदनावर कारवाई झाली नाही.

गावातील कुठल्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास प्रेत नेण्यास अडचक निर्माण होत ओह. तसेच खोदलेल्या नाल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात पाणी शिरल्यानी दाट शक्यता आहे. या कामासाठी सर्कलमध्ये नेमलेला विभागाचा अभियंता कारवाई करीत नाही. रस्त्याचे काम १५ दिवसात पूर्ण न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा प्रहार पक्षाने मुख्य कार्यपालन अधिकारी यांना जून महिन्यात दिला होता. परंतु जुलै महिना लोटत असल्यावरही सदर कामाला सुरुवात न झाल्याने आज प्रहारच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक प्रेतयात्रा मुख्य कार्यपालन अधिकारी किरण कुळकर्णी यांच्या कार्यालयापर्यंत नेली. तेव्हा प्रशासनाने मंजुर झालेले काम २० जुलै पासून सुरु करण्याचे आश्वासन शिष्ट मंडळाला दिले. यावेळी प्रहारचे जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू, जिल्हा संपर्क प्रमुख प्रदिप वडतकर, प्रफुल्ल नवघरे, सतिश आखरे, वसंता नवघरे, अक्षय शेळके, मयुर देशमुख, मंगेश शेळके, विनोद बोबडे, संजय राऊत, दिपक भोंगाळे,जोगेन्द्र मोहोड ,आदिंची उपस्थिती होती.