भव्य रक्तदान शिबीराला नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद 109 जणांनी केले रक्तदान : विविध सामाजीक संघटनांचे आयोजन

0
707
Google search engine
Google search engine





महेन्द्र महाजन जैन/  रिसोड/ वाशिम –

वाशीम : रक्तदाता  दिनानिमित्त शहरातील विविध सामाजीक व सेवाभावी संघटनांच्या आयोजनातून ‘अंधविश्‍वास की छोडीये बात, रक्तदान की कीजीये शुरुवात’ हे घोषवाक्य घेवून शहरात तीन ठिकाणी आयोजीत केलेल्या भव्य रक्तदान शिबीराला सर्वधर्मीय नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबीरात महिला, पुरुष, युवक व युवतींनी उत्साहात रक्तदान करुन या राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविला व अनेकांचे प्राण वाचविलेे.
    शहरामध्ये न.प. चौकामधील अग्रसेन भवन, अकोला नाका येथील जैन भवन व नगर परिषद रोडवरील महेश भवनात सकाळी 10 ते 1 पर्यत रक्तदान शिबीर ठेवण्यात आले होते. या रक्तदान शिबीराला विविध सामाजीक संघटनेचे सर्व अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य यांची उपस्थिती होती. रक्तदान शिबीराला जि.प. उपाध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे, अग्रवाल समाज अध्यक्ष संतोष अग्रवाल, अग्रवाल नवयुवक मंडळ अध्यक्ष डॉ. चेतन अग्रवाल, अग्रवाल ट्रस्ट वाशीमचे अध्यक्ष डॉ. राजकुमार अग्रवाल, सुरेश भारुका, बद्रीप्रसाद अग्रवाल, रमनलाल अग्रवाल, जुगलकिशोर अग्रवाल, गोपाल अग्रवाल कार्लीवाले, मनोज अग्रवाल, जैन भवन संचालक जितेंद्र छाबडा, श्‍वेतांबर जैन समाजाचे शिखरचंद बागरेचा, दिगंबर जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष हरिषचंद्र बज, कोषाध्यक्ष विपीन बाकलीवाल, महामंत्री संजोगकुमार छाबडा, दिगंबर जैन सोशल ग्रुपचे महाराष्ट्र प्रभारी प्रविण पाटणी, रवि बज, सायकलस्वार ग्रुपचे श्रीनिवास व्यास, सुरेंद्र अहिर, आदेश कहाते, अखिल भारतवर्षीय महासभेचे राजकुमार मुंदडा, श्रीराम राठी, विदर्भ प्रादेशिक माहेश्‍वरी संघटनेचे आशिष लढ्ढा, छावा संघटनेचे मनिष डांगे, गणेश गांजरे, गजानन वानखेडे व पदाधिकारी, वाशीम जिल्हा माहेश्‍वरी संघटनेचेे सहसचिव कैलास मुंदडा, वाशीम तहसिल माहेश्‍वरी संघटनेचे अध्यक्ष सचिन करवा, उपाध्यक्ष दिपक लाहोटी, आशिष हुरकट, मोची समाज अध्यक्ष नरेश सिसोदीया व पदाधिकारीगण, खत्री समाजचे मितेश खत्री व पदाधिकारी गण, सेन समाजचे गोविंद डिडवाणी व पदाधिकारी, परशुराम समाजचे उमेद खंडेलवाल व पदाधिकारी, अखिल भारतीय सुवर्णकार संघटनेचे कोषाध्यक्ष गोविंद वर्मा, डॉ. कोठेकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. विशेष उपस्थितीमध्ये महेंद्र गंडागुळे, किशोर केला, ओम बनभेरु आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

    सकाळी 10 वाजतापासून सुरु झालेल्या या रक्तदान शिबीरात दुपारी 3 वाजेपर्यत तीन ठिकाणावर एकूण 109 जणांनी रक्तदान करुन आपले सामाजीक दायित्व पार पाडले. या शिबीराच्या यशस्वीतेसाठी मारवाडी युवा मंच महाराष्ट्र उपाध्यक्ष शैलेश सोमाणी, वाशीम अध्यक्ष मनिष मंत्री, सचिव संजोग छाबडा, कोषाध्यक्ष उमेश खंडेलवाल, सौरभ गट्टाणी, हेमंत बज, विपीन बज, सचिन बज, अरविंद बाकलीवाल, लकी अग्रवाल, राहुल मानधने, प्रविण हेडा, अ‍ॅड. प्रमोद फाटक, नेल्सन अब्राहीम, आशिष भट्टड, गट्टाणी, आनंद लढ्ढा, जीवन अग्रवाल, सचिन चांडक, प्रेम अग्रवाल, विजु अग्रवाल, निखिल अग्रवाल, सचिन राठी, अमित पाटणी, अ‍ॅड. अमोल सोमाणी, रिंकु लाहोटी, अ‍ॅड. अनिकेत पोद्दार, अंकुश सोमाणी, अ‍ॅड. राहुल कोठारी, निलेश राठी,  सुमित चांडक, सुरज अग्रवाल, मधुर अग्रवाल, अमन अग्रवाल, सत्यनारायण अग्रवाल, अक्षय लढ्ढा आदींसह मारवाडी युवा मंच, हिंदवी परिवार, छावा संघटना, राष्ट्रीय अपंग महासंघ, संकल्प मल्टीपर्पज फाऊंडेशन, सावली फाऊंडेशन, अग्रवाल समाज, अग्रवाल नवयुवक मंडळ, खत्री समाज, तरुण क्रांती मंच, श्‍वेतांबर जैन समाज, मारवाडी मोची समाज, राजस्थानी सेन समाज, अखिल भारतीय मेड क्षत्रिय सुवर्णकार समाज, वाशीम तहसिल माहेश्‍वरी संघटन, परशुराम ब्राम्हण संघ, दिगंबर जैन सोशल ग्रुप आदी विविध सामाजीक संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेवून हे शिबीर यशस्वी केले.

     रक्तदान शिबीरात रक्त संकलनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रक्तपेढी तंत्रज्ञ डॉ. अश्‍विनी संदीप लहाने, सचिन किशन दंडे, डॉ. विपश्यना परवाले, डेनीयल लाड, सुभाष फुके, आरती वानखेडे, लक्ष्मण काळे, सुनिता डाखोरे, राज धनगर, तुषार बागरे यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच सौ.कांतादेवी रक्तपेढीचे वैभव वायचाळ, एस.एस. स्वामी, अक्षय जोशी, जीवन वानखेडे, करुणा भिसे यांनी मदत केली.