महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात विविध पदांसाठी थेट मुलाखत

0
483
Google search engine
Google search engine

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात विधी अधिकारी, वसुली अधिकारी व विशेष कार्यकारी अधिकारी (जमीन व मालमत्ता) या पदांसाठी २६ जुलै २०१७ रोजी थेट मुलाखती घेण्यात येणार आहेत.

पदाचे नाव-विधी अधिकारी, अर्हता- मान्यताप्राप्त विद्यापीठाची ५० % गुणांसह उत्तीर्ण आणि एलएलबी/ एलएलएम उत्तीर्ण. विधीविषयक अथवा न्यायालयातील कामकाजाचा अनुभव आवश्यक.

पदाचे नाव – वसुली अधिकारी, अर्हता-किमान पदवीधर किंवा निमशासकीय संस्थेमध्ये काम केले असल्यास प्राधान्य. महसूल व इतर शासकीय वसुली करण्याचा अनुभव आवश्यक. कायद्याचे ज्ञानही आवश्यक.

पदाचे नाव-विशेष कार्यकारी अधिकारी, अर्हता- किमान पदवीधर अथवा शासकीय / निमशासकीय संस्थेचा अनुभव असल्यास प्राधान्य. जमीन व मालमत्ता क्षेत्रात किमान १० वर्षे कामाचा अनुभव, वयोमर्यादा- ३५ ते ६५ वर्षे

अधिक माहितीसाठी www.maharashtratourism.gov.in / https://goo.gl/KGNjEN या संकेतस्थळास भेट द्या.