​चांदुर बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये तूर खरेदी सुरु- आमदार कडू यांच्या आंदोलनाची सरकार कडून दखल

0
859
Google search engine
Google search engine

बादल डकरे / चांदुर बाजार


शेतकरी संघटना अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष मंगेश देशमुख यांच्या उपस्थितीत झाली मोजणी



22 तारखे पर्यंत जर राज्य सरकार ने शेतकरी यांची तूर राज्य सरकार ने खरेदी केली नाही तर राज्यातील सर्व पालकमंत्री यांच्या घरात तूर घेऊन जाऊन आंदोलन करण्याचा इशारा  आमदार कडू यांनी सुकाणू समिती शेतकरी मेळाव्या दरम्यान 15 जुलै ला केला होता त्याची दखल राज्यसरकार ने लवकरच घेऊन तूर खरेदी चे आदेश पण काढले 
चांदुर बाजार तालुक्यामध्ये एकूण 1200 शेतकरी याना टोकन मिडाळे होते तसेच 23000 किंटल तूर हि शेतकरी यांच्या घरात पडून होती. मात्र आज दिनांक 23 जुलै रविवार ला मंगेश देशमुख यांच्या उपस्थिती मध्ये तुरीच्या मोजणीच्या सुरुवात झाली.आज सकाळी टोकन दिलेल्या 20 शेतकरी याना फोनवरून माहिती देण्यात आली आणि तूर मोजणीच्या उपस्थित राहायचे सांगण्यात आले.यामध्ये सर्वप्रथम निमखेड येथील निर्मलाताई राऊत यांची तूर मोजण्यात आली.मात्र कृषी उत्पन्न बाजार समिती ने गोदाम उपलब्ध करून दिल्यास शेतकारी याची तूर लवकरात लवकर मोजणी होणात असल्याची माहिती मंगेश देशमुख यांनी दिव्य मराठी शी बोलताना दिली.तूर मोजताना कृषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव मनीष भारंबे ,खरेदी विक्री अध्यक्ष शिवाजी बंड आणि शेतकरी उपस्थित होते.