विदर्भातील पञकांरवरील खोटे गुन्हे मागे न घेतल्यास अ.भा.ग्रा. पञकार संघ रस्त्यावर उतरणार

0
405
Google search engine
Google search engine

जिल्हाधीकारी/डि.आय.जी कार्यालया समोर एक दिवशीय धरणे आंदोलन करणार

नागपुर हिवळी अधीवेशनावर मोर्चाचे आयोजन करणार

केंद्रीय कार्यध्यक्ष मधुसुधन कुलथे, प्रदेशध्याक्ष कैलासबापुसाहेब देशमुख यांची घोषणा

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )-

अखील भारतीय ग्रामीण पञकार संघाची रविवारी  जि.प. विश्रामगृह, अमरावती येथे बैठक संपन्न झाली. चांदुर रेल्वेतील तीन पत्रकारांवरील खोटे गुन्हे मागे न घेतल्यास अ.भा.ग्रा. पञकार संघ रस्त्यावर उतरणार असुन सोबतच जिल्हाधीकारी / डि.आय.जी कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करणार व नागपुर हिवाळी अधिवेशनावर मोर्चाचे आयोजन करणार असल्याची घोषणा केंद्रीय कार्यध्यक्ष मधुसुधन कुलथे, प्रदेशध्याक्ष कैलासबापुसाहेब देशमुख यांनी यावेळी केली.
विदर्भातील नागपुर,अमरावती,अकोला,
बुलढाणा येथील पञकांरावर खोटे गुन्हे,अमानुष  मारहान, पञकांराची मुस्काटदाबी करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनातर्फे होत आहे. नुकतेच चांदुर रेल्वे येथील युवा पञकार प्रशांत कांबळे, अभीजीत तिवारी व गुड्डु शर्मा हे वृत्तसंकलनासाठी चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये गेले असता तिघांनाही खोट्या गुन्ह्यात अडकवुन त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. त्याचे पडसाड महाराष्ट्रातुन निषेध नोदंविण्यात आले होते. पंरतु अद्याप पर्यंतही पोलीस प्रशासनाने  खोटे गुन्हे मागे घेतलेले नाही.
रविवारी अ.भा.ग्रामीण पञकार संघटनेच्या  झालेल्या बैठकीमध्ये विदर्भ कार्याध्यक्ष युसुफ खान, विदर्भ संपर्क प्रमुख राहुल उके यांनी  विदर्भातील पञकांरावर पोलीस खाक्याच्या दमावर खोट्या गुन्ह्यात अडकवुन पञकारांची मुस्कटदाबी होत आहे, हा विषय मांडला. या विषयाची दखल घेत केंद्रीय कार्याध्यक्ष मधुसुधन कुलथे, प्रदेशाध्यक्ष कैलासबापु देशमुख यांनी या विषयाला समर्थन देत उपस्थीत सर्व पञकारांनी या ठरावाला संमती देत पाठींबा दिला. जिल्हा प्रशासन,पोलीस प्रशासन यांना रितसर लेखी निवदेन देऊन जिल्हाधीकारी कार्यालय, डि.आय.जी कार्यालया समोर एक दिवशीय लाक्षणीक धरणे आंदोलन करण्यात येईल अशी घोषना केली. या धरणे आंदोलनानंतरही पोलीसांनी खोटे गुन्हे मागे घेतल्या गेले नाही तर प्रत्यक्ष मुख्यमंञ्याना भेटुन शिष्टमंडळामार्फत मागणी करण्या येईल. वेळप्रसंगी नागपुर येथील हिवाळी अधीवेशनावर मोर्चाही काढण्यात येईल अशी माहिती देण्यात आली.
या बैठकीला विदर्भ कार्याध्यक्ष युसुफ खान, विदर्भ संपर्क प्रमुख राहुल उके, महीला प्रमुख राजलता बांगडी, जिल्हाउपाध्यक्ष रंजीत तिडके, बाळासाहेब सोरगीकर, सचीन ढोके, सोनवने, संजय पकडे, सुनील जंवजाळ, राजेंद्र अग्रवाल, नौशाद पठाण, गंगाधर घुरडे, गंगाधर खडसे, बाळासाहेब काळमेघ, दिपक वाघमारे व महीला पञकार उपस्थीत होत्या.