शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर न देताच काढता पाय…

0
1106

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) –

 

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठाच्या गोंधळा बाबत राज्यपाल चे विद्यासागर राव यांची भेट घेऊन शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि कुलगुरूंचा राजीनामा घ्या, अशी मागणी राज्यपालांकडे ठाकरे यांनी केली. यावर प्रतिक्रिया देत असताना तावडे यांनी विधानभवनात पत्रकारांशी बोलत असताना आपले म्हणणे पूर्ण करून पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर न देताच आपला काढता पाय घेतला.

इतर विद्यापीठाचे पदवूत्तर प्रवेश पूर्ण होताहेत, त्यामुळे इतर विद्यापीठाचे प्रवेश थांबवावेत, फेर तपासणी 600 रुपये माफ करा, ऑनलाइन ऍडमिशन होत नसताना ऑनलाइन असेसमेंट चा घाट का घातला ? आदींसंदर्भात आदित्य ठाकरे आणि राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्यासोबत चर्चा केली. विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे, विद्यापीठाचा निकाल आटोपण्यासाठी मुंबईतील महाविद्यालये गुरुवार पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. ऑनलाईन असेसमेंटसाठी 4 दिवस विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णयही दुर्दैवी असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. या सर्व कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागत आहे याला कुलगुरु संजय देशमुख आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे जबाबदार आहेत, त्यामुळे त्या दोघांचे राजीनामे घ्यावे अशी मागणी आदित्य ठाकरेंनी राज्यपालांकडे केली आहे. यावर आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस या अनुषंगाने शिक्षण मंत्री विनोद तावडे हे विधानभवनात होते त्यावर प्रतिक्रिया देत असताना, कधी कधी संघटनेचे काम करताना अभ्यास कमी पडतो हे मान्य आहे असे सांगत आदित्य ठाकरेंना टोला लगावला. युवासेना प्रमुख यांनी राजीनामा मागितला आहे, कुलगुरू एक आहेत त्यांचा मागितला असावा, बहुदा उच्च तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांचा मागितला असावा. असे सांगत आपल्या वरची जवाबदारी झटकत सेनेची झडती घेतली. तसेच कुलचिव यांची बदली ही आम्ही केली नसून तसेच शिक्षण विभागाने केली नसून केंद्रच्या मायनोरीटी विभागाने केली आहे. फेर तपासणी शुक्ल कमी करण्याबाबत मुद्दा स्वागतार्ह आहे, यावर विचार करू चर्चा करू असे तावडे यांनी आपले म्हणणे पूर्ण करीत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर न देत आपला काढता पाय घेतला.