​बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी – जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांचे निर्देश

0
575
Google search engine
Google search engine

अमरावती :-   जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यावसायिक आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. यासाठी संबंधितांनी अधिकाधिक सजग राहावे व  तालुकास्तरीय समित्यांकडून वेळोवेळी माहिती मिळवणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज येथे सांगितले.
बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवरील कारवाईबाबत जिल्हा समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अरुण राऊत, पोलीस उपअधीक्षक शिरीष राठोड यांच्यासह विविध अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.  

श्री. बांगर यांनी यावेळी जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर झालेल्या कारवाईचा तपशील जाणून घेतला. ते म्हणाले, तालुका समितीकडून वेळोवेळी माहिती घेऊन असे प्रकार घडत असल्याचे आढळल्यास वेळीच पायबंद घालावा. वैद्यकीय शिक्षणाची पदव्युत्तर पात्रता नसतानाही तशा पदवीचा पाटीवर उल्लेख करण्याचेही प्रकार घडले आहेत. अशावेळी केवळ ताकीद देऊन उपयोग नाही तर कठोर कारवाई केली पाहिजे.