(म्हणे) आम्हाला देशातून बाहेर काढा; पण वन्दे मातरम् कधीच म्हणणार नाही ! – अबू आझमी

0
558
Google search engine
Google search engine

मुंबई–

 

आम्हाला देशातून बाहेर काढा; पण खरा मुसलमान कधीच वन्दे मातरम् म्हणणार नाही. मी वन्दे मातरम्चा सन्मान करतो; परंतु माझा धर्म मला वन्दे मातरम् म्हणण्याची अनुमती देत नाही. (यावरूनच प्रत्येक मुसलमान धर्माला प्रथम प्राधान्य देतो, हेच सिद्ध होते. याविषयी तथाकथित पुरोगामी आणि धर्माविषयी आगपाखड करणार्‍यांना काय म्हणायचे आहे ? – संपादक) मग कारवाई करा किंवा जेलमध्ये टाका, असे विखारी प्रतिपादन समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी माध्यमांशी बोलतांना केले.

नुकतेच मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडूतील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालये येथे आठवड्यातून किमान एकदा वन्दे मातरम् म्हणण्याचा किंवा वाजवण्याचा आदेश दिला आहे. त्यावर आझमी यांनी वरील मत प्रदर्शित केले.