माहिती अधिकाराचे दुसरे अपील आजपासून ऑनलाईन करता येणार-सध्या ऑनलाईन द्वितीय अपील सादर करण्याची सुविधा फक्त ‘राज्य माहिती आयोग, बृहन्मुंबई’ करीता उपलब्ध

0
1038
Google search engine
Google search engine

 

माहिती अधिकारासाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा देण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. आजपासून द्वितीय अपील ऑनलाईन करण्याची सुविधा मुंबई येथे प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे,असे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी आज सांगितले.

राज्य माहिती आयोगात मोठ्या प्रमाणात दाखल होणारे द्वितीय अपिल प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी तसेच राज्य माहिती आयोगाच्या कारभारात गतिमानता आणण्यासाठी आयोगाच्या  द्वितीय ऑनलाईन अपील आज्ञावली प्रणालीचे  उद्घाटन मुख्य सचिवांच्या हस्ते करण्यात आले. नवीन प्रशासकीय भवनातील तेराव्या मजल्यावरील राज्य माहिती आयोगाच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी राज्य माहिती आयुक्त अजितकुमार जैनसामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय उपस्थित होते. 

राज्यभरात  माहितीचा अधिकार अधिनियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई येथे राज्य माहिती आयोगाच्या मुख्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. त्याचबरोबर सात ठिकाणी आयोगाची खंडपीठे देखील आहेत. मुख्यालय व अन्य सात खंडपीठातील कार्यालयांमध्ये दरवर्षी राज्यभरातून  मोठ्या प्रमाणात अपील दाखल केले जातात.

 

नियम व अटी 

https://sic.maharashtra.gov.in/siconline/SecondAppeal/Guidelines.aspx

 

  • सध्या ऑनलाईन द्वितीय अपील सादर करण्याची सुविधा फक्त ‘राज्य माहिती आयोग, बृहन्मुंबई’ करीता उपलब्ध आहे. राज्य माहिती आयोगाचे मुख्यालय व उर्वरित राज्य माहिती आयोगांकरिता सदर सुविधा लवकरच कार्यान्वित होणार आहे.
  • अपील दाखल’ करा हे बटण दाबल्यानंतर येणाऱ्या पृष्ठावरील * अशी खूण केलेले सर्व रकान्यांतील माहिती भरणे बंधनकारक आहे.
  • अर्जातील माहिती त्या-त्या रकान्यात 150 शब्द मर्यादेपर्यंत भरता येईल.
  • एखाद्या प्रकरणी अर्जातील माहिती 150 शब्दांपेक्षा जास्त असेल तर ती माहिती वेगळ्याने स्कॅन करुन अपलोड करावी.
  • द्रारिद्रय रेषेखालील अपिलार्थी वगळून अन्य अपिलार्थीनी ऑनलाईन द्वितीय अपील अर्जाच्या पहिल्या पृष्ठावरील माहिती भरल्यानंतर विहित शुल्क अदा करण्यासाठी ‘पेमेंट पेज’ (payment page) वरील ‘make payment’ येथे click करावे.
  • “अपिलार्थीना द्वितीय अपिलाकरिता विहित शुल्क पुढील मार्गानेही अदा करता येईल: (i) इंटरनेट बँकींग (ii) ए.टी.एम.-कम-डेबिट कार्ड (iii) व्हिजा/मास्टर क्रेडिट कार्ड.”
  • विहित शुल्क अदा केल्यानंतर द्वितीय अपील अर्ज दाखल करुन घेतला जाईल व त्याला एक निश्चित नोंदणी क्रमांक देण्यात येईल. तो अपिलार्थीस एसएमएस व ई-मेलद्वारे कळविण्यात येईल. हा नोंदणी क्रमांक अपिलार्थीस त्यांच्या अपिलाच्या अनुषंगाने भविष्यात संदर्भासाठी वापरता येईल.
  • माहितीचा अधिकार नियम, 2012 मधील तरतूदीनुसार द्रारिद्रय रेषेखालील अपिलार्थीना शुल्क अदा करण्याची आवश्यकता नाही. तथापि, त्‍या अपिलार्थीनी, त्या पृष्ट्यर्थ संबंधित शासकीय प्राधिकरणाने निर्गमित केलेले द्रारिद्रय रेषा प्रमाणपत्र द्वितीय अपील अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
  • “अपिलार्थीनी सादर केलेले ऑनलाईन द्वितीय अपील, इलेक्ट्रॉनिक पध्दतीने राज्य माहिती आयुक्त, बृहन्मुंबई कार्यालयातील नोडल अधिकाऱ्यांकडे जाईल. नोडल अधिकारी हे अपील इलेक्ट्रॉनिक अथवा प्रत्यक्ष (physically) रितीने संबंधित सहायक कक्ष अधिकाऱ्यांकडे पाठवील. “
  • ऑनलाईन द्वितीय अपील संदर्भात अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता असल्यास तसे सहायक कक्ष अधिकारी अपिलार्थीस कळवून द्वितीय अपील अर्ज परत करतील. अपिलार्थीस ‘View Status’ या पर्यायाद्वारे ही सद्य:स्थिती समजू शकेल. तसेच, या संबंधीचा E-mail अपिलार्थीस पाठविण्यात येईल.
  • नोंदणी क्रमांक अपिलार्थीस त्यांच्या अपिलाच्या अनुषंगाने भविष्यात संदर्भासाठी वापरता येईल.
  • “माहितीचा अधिकार नियम, 2012 मधील तरतूदीनुसार द्वितीय अपील अर्ज सादर करताना रु. 20/- इतके विहित केलेले शुल्क अदा करणे आवश्यक आहे. “
  • “अपिलार्थी पुढील बाबींची सद्य:स्थिती तपासू शकतो: 1. द्वितीय अपील सादर केल्याचा दिनांक, 2. काही सहाय्यभूत कागदपत्रे मागविली असल्यास, 3. द्वितीय अपील सुनावणी व निर्णयाचा दिनांक. “
  • एस.एम.एस. प्राप्त होण्याकरिता अपिलार्थीनी त्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी नमूद करणे अनिवार्य आहे.
  • माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत द्वितीय अपील अर्ज दाखल करण्याबाबतच्या व इतर तरतुदी उदा.कालमर्यादा,अपवाद इत्याद‍ि सर्व लागू राहतील.

 

 

 

द्वितीय अपील अर्ज सादर करण्यापूर्वी खालील सूचना वाचा

https://sic.maharashtra.gov.in/siconline/SecondAppeal/SecondAppealNew.aspx

  • * दर्शवून केलेले सर्व रकाने भरणे बंधनकारक आहे.
  • अर्जासोबत अपलोड करावयाची माहिती पीडीएफ स्वरुपातच असावी.
  • जास्तीत जास्त 2 एमबी साईज पर्यंतची माहिती अपलोड करता येईल.
  • अर्ज दाखल केल्यानंतर अर्जास अपील क्रमांक कळविण्यात येईल. तोच पुढील सद्यस्थिती तपासण्यासाठी वापरावा.
  • खालील कागदपत्रे वेगवेगळी पीडीएफ करुन अर्जासोबत जोडली नसल्‍यास व्दितीय अपील दाखल करून घेतला जाणार नाही.
  • खालील कागदपत्रे पीडीएफ करुन अर्जासोबत जोडावी:
    • मूळ माहिती अर्ज पीडीएफ करुन
    • माहिती अर्जास जन माहिती अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेले उत्तर
    • प्रथम अपील अर्ज पीडीएफ करुन
    • प्रथम अपील अर्जास प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेले उत्तर
    • दारिद्रय रेषेखालील नागरिकांनी दारिद्रय रेषेखाली असल्याचा पुरावा सादर करावा.