सुरक्षेच्या दृष्टीकोणातुन चांदुर रेल्वे व धामणगाव बस स्थानकात सि.सि.टी.व्ही. बसवा-प्रहारतर्फे चांदुर रेल्वे आगार व्यवस्थापकांना निवेदन

0
1109
Google search engine
Google search engine

शालेय वेळेवर धामणगाव – मंगरूळ दस्तगीर बस सुरू करा

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )-

 

सुरक्षीतेच्या दृष्टीकोणातुन सर्व कार्यालयात सि.सि.टी.व्ही. कैमेरे बसविण्यात आले आहे. परंतु चांदुर रेल्वे व धामणगाव बस स्थानकात सि.सि.टी.व्ही. कैमेरे नसुन ते तत्काळ बसवावे व  शालेय वेळेवर धामणगाव रेल्वे – मंगरूळ दस्तगीर बस सुरू करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे स्थानिक आगार व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
धामणगाव रेल्वे बस स्थानकावर दिवसेंदिवस महिला व मुलींच्या छेडखानीचे प्रमाण वाढत आहे. तसेच रात्रीचे अनेक अनुचीत प्रकार सुध्दा घडतात. त्यामुळे महिला, मुलींची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षीतेच्या दृष्टीकोणातुन धामणगावसह चांदुर रेल्वे बस स्थानकावर सुध्दा सि.सि.टी.व्ही. कैमेरे बसवावे, बस स्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी बाकांची कमतरता असुन तेथे अजुन बैठक व्यवस्था करावी, शालेय वेळेत धामणगाव- मंगरूळ दस्तगीर बस नसुन ही बस वेळेवर उपलब्ध करून द्यावी या मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षातर्फे चांदुर रेल्वे आगार व्यवस्थापकांना देण्यात आले.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे धाणनगाव – चांदुर रेल्वे विधानसभा सर्कल प्रमुख प्रफुल्ल डाक, चांदुर रेल्वे तालुका प्रमुख सौरभ इंगळे, विद्यार्थी तालुका प्रमुख राहुल चांभारे, विपिन देशमुख, रोशन जेवडे, आदित्य भुसारी यांसह अनेक प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.