निवडणुकीतील उत्कृष्ट कार्याबद्दल श्री प्रशांत दैठणकर यांचा सत्कार

0
507
Google search engine
Google search engine

 

गडचिरोली-

 

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गडचिरोली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गडचिरोलीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांचा आज येथे महसूल दिनी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला .
गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. बिपीन इटनकर, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनावणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
नागपूर विभागात फेब्रुवारी महिन्यात 3 जिल्हयातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणूका झाल्या. या निवडणुका निर्भय, मुक्त वातावरणात व पारदर्शक पध्दतीने होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल आयुक्त , राज्य निवडणूक आयोग यांनी घेऊन याबाबत अभिनंदन करण्यासाठी प्रशस्तीपत्र देण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत, असे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी दिलेल्या या प्रशस्तीपत्रात म्हटले आहे.