लोकशाही हि फक्त एक राजकीय व्यवस्थाच नसून ती जीवन पद्धत – श्री धनंजय मुंडे

0
1573
Google search engine
Google search engine

शंकर नारायण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिली विधानभवनाला भेट

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – लोकशाही हि फक्त एक राजकीय व्यवस्थाच नसून ती जीवन पद्धती आहे. हि जीवन पद्धती रुजवण्याची क्रिया निरंतर चालू राहिल्यास लोकशाही मजबूत राहील. असे प्रतिपादन विधानपरिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी शंकर नारायण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाज पाहण्याचा अनुभव घेतल्यानंतर त्यांच्याशी बोलताना केले.

  

शिक्षण व्यवस्थेत क्षेत्रभेटीची व्यवस्था असून प्रत्यक्ष अनुभवाला महत्वाचे स्थान आहे. विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी च्या राज्यशास्त्रात अभ्यासक्रमात राज्य विधिमंडळाची माहिती आहे. हे ज्ञान फक्त पुस्तकी न राहता अनुभवता यावे याच उद्देशाने हि भेट आयोजित करण्यात आल्याचे विषय प्राध्यापक निमेश पाटील यावेळी म्हणाले. एखादा पाठ्यघटक फक्त त्या वर्षीच्या परीक्षे पुरता मर्यादित न राहता, पुढच्या अभ्यासात सुद्धा त्याचा उपयोग व्हावा यासाठी अशा भेटी उपयुक्त ठरतात. प्रतिवर्षी आमच्या वर्गात विद्यार्थी संसदेचे सुद्धा आयोजन होते अशी माहिती सुद्धा पाटील यांनी दिली. या सर्वच उपक्रमातून विद्यार्थ्यांची विषयासाठी गोडी वाढीस लागते. प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना या भेटी निमित्ताने विचारणा केल्यावर अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. या भेटीचे आयोजन पद्धतशीर पणे करण्यात आले होते. प्रतीक कारखानीस या विद्यार्थ्याने सांगितले की, येथे येण्या अगोदर आमच्या वर्गात प्रेसेंटेशन द्वारे आम्हाला इथली संपूर्ण माहिती देण्यात आली होती. त्यामुळे इथले कामकाज बघताना समजून घेणे सोपे झाले. राज्य विधिमंडळाची रचना, विधानसभा, विधानपरिषद या दोन्ही सभागृहाची कार्य व अधिकार, सभागृहातील आसन व्यवस्था, सभागृहात हिरवा आणि लाल रंगाच का ? आदी सर्वच माहिती आम्हाला अवगत करून देण्यात आली होती. लोकप्रतिनिधी जनतेच्या मुद्द्यांवर किती गंभीरपणे चर्चा करतात हे आम्हाला पाहायला मिळाले, असे कृष्णा शर्मा या विद्यार्थिनी ने सांगितले. तर भविष्यात मला सुद्धा राजकारणात उतरायला आवडेल असे सचिन शिंदे हा विद्यार्थी म्हणाला. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी वेळात वेळ कडून या विद्यार्थी गटाची भेट घेतली. विद्यार्थ्यांनी पाहिलेल्या विधिमंडळ कामकाजाबद्दल त्यांना प्रतिक्रिया विचारली. त्यांच्याशी गप्पा मारल्या. हा अनुभव सुद्धा मुलांसाठी आनंददायक ठरला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू यादव यांनी सुद्धा या सर्व उपक्रमाचे कौतुक केले. लोकशाहीच्या उत्कर्ष साठी अनुकूल अशी शिक्षण पद्धती देण्यास आम्ही बांधील आहोत अशी प्रतिक्रिया सदर महाविद्यालयाच्या संस्थेचे अध्यक्ष रोहिदास पाटील यांनी दिली. महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आणि आता विधिमंडळ कामकाजाचा अभ्यासक शाहरुख मुलाणी यांनी विधानभवन या वास्तु बद्दल माहिती दिली. या रचनात्मक प्रयत्नानं बद्दल त्याने अभिमान व्यक्त केला. राजकारणाबद्दल नकारात्मक चित्र बदलने आवश्यक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी लोकशाही संस्थाची माहिती फक्त परिक्षे पुर्त न अभ्यासता भेट देणे महत्वाचे आहे.