​वाशीम येथे रविवारी मराठा क्रांती मोर्चा जनजागृती रॅली 

0
954
Google search engine
Google search engine

वाशीम, (रुपेश पाटील बाजड ):- 


 मुंबई येथे ता. नऊ ऑगस्ट ला आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी मराठा क्रांती मोर्चाच्या वाशीम जिल्ह्यात जनजागृती संदर्भात जनजागृती रॅलीचे आयोजन रविवारी (ता.६) दुपारी दोन वाजता करण्यात आले आहे. 
सकल मराठा समाजाच्यावतीने येथील विश्रामगृहावर आज (ता.२) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये समाजबांधवांनी मुंबई येथे बुधवारी (ता.९) आयोजित करण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृतीसाठी वाशीम शहरातून मोटार सायकल रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोटार सायकल रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून पाटणी चौक, जिजाऊ चौक, पुसद नाका, मन्नासिंह चौक व जुन्या गणपती मिरवणूक मार्गाने निघणार आहे. या रॅलीमध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील व गावातील समाजबांधव सहभागी होणार आहेत. रॅलीत महिलांचा सहभागही राहणार असल्याची माहिती, मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने दिली आहे.