गुरुग्राम येथील शाळेत हिंदु विद्यार्थ्यांवर धर्मांतरासाठी दबाव आणणारे मुसलमान शिक्षक निलंबित

0
657
Google search engine
Google search engine

गुरुग्राम (हरियाणा) – मेवात मॉडल स्कूल मढी (नगीना) या शाळेत हिंदु विद्यार्थ्यांना बळजोरीने नमाजपठण करण्यास आणि धर्मांतर करण्यास दबाव टाकण्यात येत होते. यासाठी त्यांचा छळ करण्यात येत होता. या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली. त्यानंतर त्यांनी मोईनुद्दीन आणि मुबारिका या मुसलमान शिक्षकांना निलंबित केले, तर आरिफ याचे स्थानांतर केले. तसेच जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली३ सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली.