पहिल्या पसंती क्रमास  प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेबाबतचे सुधारित वेळापत्रक चौथ्या फेरीनंतर जाहीर होणार – चौथी गुणवत्ता यादी उद्या

0
589
Google search engine
Google search engine

 

अकरावी प्रवेशाची नियमित चौथ्या व शेवटच्या फेरीत प्रवेश घेण्यासाठीची मुदत शुक्रवार दि.4 ऑगस्ट रोजी संपली असून या फेरीची गुणवत्ता यादी रविवारी (दि. 6) जाहीर होणार आहे. या यादीतील विद्यार्थ्यांना दि. 9 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत प्रवेश घेता येणार असून प्रत्येक फेरीतील पहिल्या पसंतीचे विद्यार्थी आणि अद्याप प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेबाबतचे सुधारित वेळापत्रक चौथ्या फेरीनंतर जाहीर होणार असल्याची माहिती प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मीनाक्षी राऊत यांनी दिली आहे. 

महाविद्यालयांच्या अकरावी नियमीत प्रवेशाची शेवटची व चौथी फेरी सुरू झाली असून या फेरीची गुणवत्ता यादी रविवार दि. 6 ऑगस्ट रोजी जाहीर होणार असून सोमवार दि. 7 पासून प्रवेशास सुरुवात होणार आहे.

सोमवारी रक्षाबंधन सण असल्यामुळे अनेक महाविद्यालयांना सुट्टी असते. त्यामुळे त्या दिवशी प्रवेश प्रक्रिया काही महाविद्यालयांमध्ये बंद राहण्याची शक्यता आहे. याचा विचार करून प्रवेश नियंत्रण समितीने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ देवून दि. 9 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार असल्याचे कळविले आहे.

दरम्यान ज्या कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे प्रवेश साधारण 75 टक्के झाले आहेत, अशा महाविद्यालयांनी त्या महाविद्यालयांचे सत्र दि. 9 ऑगस्टपासून सुरू करावे. उर्वरित फेर्‍यांमधून जे विद्यार्थी प्रवेश घेतील अशा विद्यार्थ्यांचे रविवार व सुट्टीच्या दिवशी विशेष वर्ग घेवून अभ्यासक्रम पूर्ण करावा, अशा सूचना देखील उपसंचालक दिनकर टेमकर यांनी महाविद्यालयांना दिल्या आहेत.

पहिल्या पसंती क्रमास  प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेबाबतचे सुधारित वेळापत्रक चौथ्या फेरीनंतर जाहीर होणार आहे अशी माहिती प्रवेश समिती कडून दिली गेली आहे

 

https://amravati.11thadmission.net/