राज्यातील पत्रकारांसाठी संरक्षण कायदा जागृती कार्यशाळा – ऑल जर्नालिस्ट फ्रेंड्स सर्कलचे आयोजन.

0
837


मुबई/अमरावती :

 

ऑल जर्नालिस्ट फ्रेंड्स सर्कल ही पत्रकार व विविध सामाजिक क्षेत्रातील काम करणाऱ्या मित्रांची देशव्यापी संघटना आहे. या एजेएफसी संघटनेच्या वतीने राज्यातील पत्रकारांसाठी इंडस्ट्रीयल इस्टेट सभागृह पनवेल येथे गुरुवार दिनांक ९ ऑगष्ट या क्रांतीदिनी शहरासह ग्रामीण भागातील पत्रकारांना सरंक्षण कायदा या विषयाबाबत जनजागृती व्हावी तसेच गेल्या अनेक वर्षापासून प्रसार माध्यमात काम करणा-या ग्रामीण भागातील पत्रकारांना ही अधिस्विकृती मिळायलाच हवी ही मागणी एजेएफसी संघटनेकडून शासनाला करण्यात येणार आहे. याबरोबरच पत्रकारांच्या विविध समस्यांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यात येणार आहे तरी राज्यातील जास्तीत जास्त पत्रकार बांधवांनी या कार्यशाळेला उपस्थित रहावे असे आवाहन एजेएफसी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री  एम.डी.चव्हाण, कार्याध्यक्ष श्री संदीप बाजड यांच्यासह समस्त पदाधिकारी व सदस्य तथा आयोजकांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील पत्रकारांसाठी पत्रकार संरक्षण कायदा मंजूर केला आहे. हा कायदा अंमलबजावणीमध्ये येणार आहे. कायद्याचा लाभ कुणाला होवू शकतो ? कायद्याची नियमावली व आपला त्यात सहभाग हे महत्वाचे विषय आहेत. या कायद्याविषयी राज्यातील तज्ञांकडून पनवेल येथील इंडस्ट्रीयल इस्टेट सभागृह येथे होणा-या कार्यशाळेत पत्रकारांना मार्गदर्शन होणार आहे. या कार्यशाळेला उद्घाटक म्हणून पनवेल महानगर पालिकेच्या महापौर डॉ.कविता चौतमल तर पनवेल इंडस्ट्रीयल कॉ-ऑफ इस्टेट लिमिटेडचे अध्यक्ष विजय लोखंडे उपस्थित राहणार आहेत. तर राज्यातील पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे माहिती व जनसंपर्क संचालक देवेंद्र भुजबळ, माहिती व जनसंपर्क वरिष्ठ सह संचालक डॉ.संभाजी खराट, आयबीएन लोकमतचे वृत्तसंपादक राजेंद्र हुंजे, दैनिक कृषीवलचे संपादक प्रसाद केरकर, पुण्याचे जेष्ठ पत्रकार अभिमन्यू थोरात व अमरावती जिल्ह्यातील तरूनभारतचे जेष्ठ प्रतिनिधी अजय देशपांडे हे प्रमुख मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील पत्रकार बांधवांसाठी विशेष निमंत्रण असून पत्रकारांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन ऑल जर्नलिस्ट फ्रेंड्स सर्कलचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर आबिटकर, केंद्रीय अध्यक्ष यासीन पटेल, केंद्रीय उपाध्यक्ष गणेश कोळी, केंद्रीय सचिव विकास कुळकर्णी, प्रदेश अध्यक्ष महादेव चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष संदिप बाजड, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, विठ्ठल मोघे, दीपक घोसाळकर, प्रमोद हर्डिकर, कुमार कडलग, राजेश पाटील, नारायण पवार, सुनिल देसाई, प्रदेश सरचिटणीस कांचन जांबोटी, राज्य संपर्क प्रमुख सतीश महामुनी, प्रदेश संघटक अतुल होनकळसे, प्रदेश प्रवक्ते विजय तायडे, विदर्भ विभाग अध्यक्ष विजयकुमार खवसे, कोकण विभाग अध्यक्ष राजेंद्रकुमार शिंदे, प.महाराष्ट्र विभाग अध्यक्ष ईश्वर हुलवान, मराठवाडा विभाग अध्यक्ष पंकज सुतार, उ.महाराष्ट्र विभाग अध्यक्ष सुरेश पाटील यांच्यासह राज्यातील जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांनी केले आहे.