मराठा मोर्चेकऱ्यांच्या गाडीला अपघात; ३ ठार

37


मराठा क्रांती मोर्चात सहभागी होऊन गावाकडं परतणाऱ्या मोर्चेकऱ्यांच्या एका गाडीला औरंगाबाद-नाशिक रोडवर झालेल्या अपघातात तीनजण जागीच ठार झाले आहेत, तर दोन जखमी झाले आहेत. जखमींवर वैजापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे

हा अपघात इतका भयानक होता की गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. त्यात नारायण थोरात (गाजगाव), अविनाश गव्हाणे (बजाज नगर, इटावा), गौरव प्रजापती (बजाज नगर) हे तिघे जागीच ठार झाले.