भाजप सरकारचे लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर” – आ.डॉ.अनिल बोंडे यांनी साधला शेतकऱ्यांसोबत सवांद

0
597
Google search engine
Google search engine

वरुड : राज्य सरकारने लोकप्रतिनिधींना बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे कार्य शिवार सवांद यात्रेच्या माध्यमातून हाती घेतले आहे. उन्नत शेती – समृध्द शेतकरी अभियान सभा व शिवार सवांद यात्रेच्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी पुढाकार घेऊन मोर्शी – वरुड तालुक्यासह जिल्ह्यातील इतर गावातही प्रत्यक्ष भेटी देऊन शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला तीन तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला अडीच वर्ष पूर्ण झालीत, भाजपा सरकारच्या कार्यकाळातील फलश्रुती बाबत अधिक माहिती डॉ. बोंडे यांनी शेतकऱ्यांना दिली.

      वरुड तालुक्यातील पेठ मांगरूळी येथे आ.डॉ.अनिल बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली शिवार संवाद सभेच्या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी मातोश्री त्रिवेणी बोंडे महिला सूतगिरणी मोर्शीच्या अध्यक्षा डॉ.वसुधाताई बोंडे, तालुका कृषी अधिकारी उज्वल आगरकर, पेठ मांगरुळीचे उपसरपंच राजीव गांधी, विजय यावले, नरेंद्र रानोटकर, कृषी सहायक अधिकारी सुरेश भेंडे, केने मैडम, जिचकार मैडम, योगेश कडू, विनोद बोंडे, अंभोरे सह गावातील शेतकरी भाऊराव वाघ, योगेश ब्राम्हणे, पदमाकर साळवी, रवींद्र धोटे, राजेश कोंडे, संजयराव फुले, बंडू ब्राम्हणे, उत्तम ब्राम्हणे, श्रीकांत मुर्हेकर, मंगेश वानखडे, उध्दव संकुसरे, श्रीकृष्ण रानोटकर, वर्षा हाटे, नारायण ब्राम्हणे, गुंफाबाई कुसरे, हर्षाली मसाने, राजश्री ब्राम्हणे, कमला ब्राम्हणे, लक्ष्मीबाई कुकडे, कमला हरले, अनुराधा फुले, दिलीप बासुंदे, शिवाजी ब्राम्हणे, प्रकाश ब्राम्हणे, उमेश ब्राम्हणे, राजेंद्र घोरमाडे, प्रणव यावले, अरुण ब्राम्हणे, ज्ञानेश्वर भालेराव, किशोर गावंडे, शालीकराम ब्राम्हणे, प्रभाकर ब्राम्हणे, सौरभ ब्राम्हणे, दिनेश ब्राम्हणे, रवींद्र ब्राम्हणे, ज्ञानेश्वर ब्राम्हणे, दीपक बासुंदे, नामदेवराव बासुंदे, आर.ए. ब्राम्हणे, एन.पी. ब्राम्हणे, यु.कि.कुकडे, आकाश धोटे, लीलाधर ब्राम्हणे, वासुदेवराव हरले, चरणदास ब्राम्हणे, ज्ञानेश्वर घोरपडे, श्रीराम ब्राम्हणे, प्रकाश ब्राम्हणे, योगेश कडू, एस.एम.भेंडे यांच्यासह आदी गावकरी तसेच शेतकरी महिला – पुरुष बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.