सांडपाणी च्या पाईप फुटल्याने इमारतीस धोका- माणिकराव निचत यांची ग्राम पंचायत काजळी येथे तक्रार

0
615

सात दिवस होऊनही कार्यवाही शून्य

बादलकुमार डकरे / चांदुर बाजार-

चांदुर बाजार तालुक्यातील काजळी गावातील वार्ड क्रमांक 2 मधील रहिवाशी नर्मदा टिगणे यांच्या घरातील सांडपाणी याचा पाईप फुटल्याने त्या पाईप चे सर्व सांडपाणी श्री माणिकराव निचत यांच्या घराजवळील नळ्याच्या खड्यात मागील एक महिन्यापासून मुरत आहे त्यामुळे निचत यांच्या इमारतीला धोका पोहचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.ग्राम पंचायत पदाधिकारी यांनी या जागेची 2 वेळा निचत यांनी तोंडी सांगितल्यावर केली मात्र कोणतीच उपाययोजना ग्राम पंचायत काजळी आखू शकली नाहीं म्हणून त्यांनी काल दिनांक 26 सप्टेंबर ला आपली लिखित स्वरूपाची तक्रार काजळी येथील ग्रामपंचायत कार्यलयात दाखल केली आहे.

प्रशासन मुद्दाम त्यानं कोण जागे करणारं याची वाट पाहत का?की कोणीतरी येणार आणि आपल्याला जागी करणार तेव्हाच आपण काम करू? अशी परिस्तिथी ग्राम पंचायत काजळी ची दिसत आहे.तिकडे राज्य सरकार ग्राम विकासाकरिता नवनवीन योजना आखत आहे तर काजळी गावामध्ये कधी विकास होणार हे पण तितकेच महत्त्वाचे ठरते. निचत याची इमारत ही सिंगल मजली असल्याने सांडपाणी ज्या ठिकाणी आहे त्या जागी खोल खड्डा पडला तर संपूर्ण सांडपाणी हे त्या इमारतीस धोका पोहचविणार आहे.त्यामुळे ग्राम पंचायत या वर कोणती उचित कार्यवाही करणार हे पाहावेच लागेल.तसेच इमारतीस काही हानी झाल्यचि जबाबदारी ही ग्राम पंचायत काजळी ची राहतील असेही निचत यांनी आपल्या तक्रारी मध्ये लिहिले आहे.तरी ग्राम पंचायत पदाधिकारी या की तातडीने लक्ष देतील हे पाहावे लागेल.