विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसाला 10 लाख रुपये मदत द्या अन्यथा – कृषी सचिव , कृषी मंत्र्यांच्या कार्यालयावर किटकनाशकांची फवारणी करू- आमदार श्री बच्चू कडू

0
1167
Google search engine
Google search engine

यवतमाळ:-

विषारी कीटकनाशकांच्या फवारणीमुळे यवतमाळमध्ये आतातपर्यंत १८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी ही धक्कादायक आकडेवारी सादर केली आहे. शेतकऱ्यांनी ठराविक कीटकनाशकं फवारली जी अत्यंत विषारी होती, ती श्वसनावाटे शेतकऱ्यांच्या शरीरात गेल्याने या शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. काही शेतकऱ्यांनी या विषारी कीटकनाशकामुळे दृष्टी गमावली आहे. आमदार बच्चू कडू यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या काही शेतकऱ्यांची भेट घेतली. ही भेट घेतल्यानंतर कडू यांची पत्रकारांशी बोलताना या शेतकऱ्यांना १० लाख रुपयांची मदत द्या नाहीतर कृषी सचिव किंवा आणि कृषी मंत्र्यांच्या कार्यालयावर याच किटकनाशकांची फवारणी करू असा गंभीर इशारा दिला आहे. एलफिन्स्टन ब्रिजवर मृत्यूमुखी पडलेल्यांना सरकारने १० लाखांची मदत दिली तशीच मदत या शेतकऱ्यांनाही द्यावी अशी मागणी बच्चू कडू यांची आहे.

यवतमाळ जिल्हयातील मारेगाव, वणी, पांढरकवडा, पुसद, आर्णी व महागाव या तालुक्यांमध्ये गेल्या तीन महिन्यात किटकनाशक फवारताना विषबाधा झाल्याने १८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर ७ शेतमजुरांची दृष्टी गेल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. विषबाधा झालेल्या ३१५ रुग्णांवर शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. जुलै ते सप्टेंबर दरम्यान या घटना घडल्या आहेत.