भाजपाने राबविले “स्वच्छ्ता अभियान”

0
774
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे – : (शहेजाद खान ) –
स्थानिक भारतीय जनता पार्टी व भाजयुमो तालुका व शहर यांच्या वतीने शहरात”स्वच्छ्ता अभियान” राबविन्यात आले.
   पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या कालावधीत “स्वच्छ्ता अभियान” कार्यक्रम राबविण्यात आला. त्याचा समारोपिय कार्यक्रम सोमवारी “महात्मा  गांधी जयंतीदिनी” स्वच्छ्ता करुन करण्यात आला. यामध्ये ग्रामीण रुग्णालय संपूर्ण परिसरासह वार्डाची स्वच्छता, बस स्थानक परीसरासह तालुक्यातील आमला,पलसखेड,चांदुरवाडी येथेही स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले. तसेच थोर पुरुषांचे पुतळे पाण्याने धुुण्यात आले. vidarbha24news.com
      या अभियानात भाजयूमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रताप अडसड, भाजयुमो तालुका अध्यक्ष सचिन लांजेवार, शहर अध्यक्ष पवन ठाकुर, भाजपा तालुका अध्यक्ष रवि उपाध्ये, नगरसेवक निलिमा शर्मा, संजय पुरसाम, नगरसेवक अजय हजारे, विजय मिसाळ, विलास तांडेकर, प्रमोद नागगमोते, छोटूभाऊ विश्वकर्मा, गुड्डु बजाज, केशव वंजारी, वसंत खंडार, उत्तमराव ठाकरे, बबनराव गावंडे, संदीप सोळंके, राजू  अम्बापुरे, मुन्ना शर्मा, लता बागड़े, अतुल शिरभाते, आशुतोष शर्मा, संजय आंबटकर, राजेश डिवरे, विजय काळे, शुभम डिवरे, लाला पनंपालिया, राजू सोळंके, जाकिरभाई, गणेश ढबाले, सोनू पठान, आकाश वाघड़े, ईशांत शर्मा, लोकेश माकोडे, अभिजीत तिवारी,पपी पटले, सुभाष कोटेजा, राजेंद्र पाटिल आदी कार्यकर्ते उपस्थित होते..