जेष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षपदावर उत्तमराव गावंडे  तिसऱ्यांदा फेरनिवड। उपाध्यक्षपदी प्रा. विश्वासराव दामले तर सचिवपदावर दत्तात्रय भोयर यांची वर्णी

0
524

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान)

विश्वास दामले

दत्तात्रय भोयर

 शहरातील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने दिनांक 1 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त गांधी चौकातील महाविर भवन, जैन मंदिर सभागृहात ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या दुसर्‍या सत्रात दुपारी 3 वाजता वार्षिक आमसभा घेण्यात येऊन या सभेत दोन वर्षासाठी नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. त्यानुसार जेष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षपदावर उत्तमराव गावंडे,  उपाध्यक्षपदावर विश्वासराव दामले तर सचिव पदावर दत्तात्रय भोयर यांची निवड करण्यात असुन  यासोबतच सहसचिवपदावर दिपकराव देशमुख,  कोषाध्यक्षपदावर नारायणराव देशमुख, कार्यकारणी सदस्य पदावर कमलाकर मानकर, प्रभाकरराव भगोले,रमेशराव घिके,  मधुकरराव जोग, वसंतराव गहुकार, रविंद्र भैसे, वसंतराव तिखे, पांडुरंग वंजारी,  गोपाळराव मालखेडे व सुधाताई मालखेडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडीच्या कार्यक्रमानंतर उपस्थित सभासदांनी सर्वांचे अभिनंदन केले. उत्तमराव गावंडे, दत्तात्रयराव भोयर व नारायणराव देशमुख यांची तिसऱ्यांदा महत्त्वाच्या पदावर निवड झाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे..