इसापूर ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा- सोनम उईके यांची सरपंच पदी अविरोध निवड

0
1102

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी सरपंच महिलेचा सत्कार

मुख्यमंत्री, महसूलमंत्री, आमदारांनी दिल्या शुभेच्छ्या.

वरुड (अमरावती) : –

राज्यातील गांव – खेडी स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने, त्याच्या विकासाला गती देण्याच्या उद्देशाने सरपंचांचे आणि ग्रामसभेचे अधिकार वाढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय नुकताच राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. नगराध्यक्षाप्रमाणे सरपंचांची निवड हि थेट – जनतेतून होत असल्याने त्याचा फायदा ग्रामीण भागाला होणार असल्याने असा निर्णय शासनाने नुकताच अस्तित्वात आणला आहे. आणि तो निर्णय अभिनंदनास पात्र ठरला, कारण याचे ताजे उदाहरण म्हणजे आज पार पडलेल्या इसापूर ग्राम पंचायतीचा निकाल. यावेळी गावातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टी व मोर्शी – वरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांच्यावर विश्वास ठेवत सोनम उईके या अनुसूचित जातीच्या महिलेला गावकऱ्यांनी एकमताने सरपंच पदी विराजमान केले. यावेळी भाजपाच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ.वसुधा बोंडे यांनी सरपंच महिलेचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छ्या प्रदान केल्या. ग्राम पंचायतीच्या निकालापूर्वीच इसापूर ग्राम पंचायतमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवून मतदार संघात खाते उघडले. यामुळे संपूर्ण तालुक्यासह मतदार संघात मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

सध्या केंद्रात व राज्यात तसेच तालुक्यात हि भारतीय जनता पार्टीच नागरिकांच्या हिताचे काम करू शकते, याउद्देशाने मतदारांनी होवू घातलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये नागरिकांनी अविरोध मतदान करून तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये यावेळी हि भाजपाच्या हाती सत्ता देण्याचा मार्ग सुकर केला आहे. त्याचे उदाहरण म्हणजे तालुक्यातील इसापूर ग्राम पंचायत सरपंच महिला अनुसूचित जातीच्या महिलेला एकमताने सरपंच पदी निवडून दिले आहे. ग्राम पंचायत निवडणुकी दरम्यान मोर्शी – वरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी गावाच्या विकासाकरिता बिनविरोध निवडणुकीचे आवाहन ग्रामवासी मतदार बांधवांना केले होते. या आवाहनाला ग्रामवासियांनी योग्य प्रतिसाद देत सरपंच सौ.सोनम नंदकिशोर उईके यांना अविरोध निवडून सरपंच पदावर विराजमान केले. नवनिर्वाचित सरपंच सोनम उईके यांच्या निवडीचे अभिनंदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील तसेच मोर्शी – वरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी मुंबई येथून दूरध्वनीद्वारे केले. व येत्या रविवार ८ ऑक्टोंबर २०१७ रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे सन्मानपूर्वक सत्कार होणार असल्याची माहिती मतदार संघाचे भाजपा आ.डॉ.अनिल बोंडे यांनी दिली. तसेच महिला सरपंच पदी निवडीबद्दल आ.डॉ.अनिल बोंडे यांच्या अर्धांगिनी डॉ.वसुधा बोंडे यांनी इसापूर ग्राम पंचायत नवनिर्वाचित सरपंच सोनम उईके यांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व अभिनंदन केले, त्यासोबतच ग्राम पंचायतच्या वाटचालीबाबत शुभेच्छ्या प्रदान केल्या.

यावेळी नगर परिषद वरुडचे उपाध्यक्ष किशोर भगत, शिक्षण सभापती नलिनी रक्षे, भाजपा तालुका सरचिटणीस राजकुमार राऊत, शरदराव राऊत, हरिभाऊ पिकले, गोपाल पुंड, वरुड युवा मोर्चा शहराध्यक्ष निलेश अधव, हर्षल रक्षे, तसेच आलोडा येथील भाजपा पदाधिकारी मनोहर दाभाडे, अरविंद कोकाटे, विनायक धुर्वे, रामकृष्ण झामडे, गोपाल झामडे, गजानन दाभाडे, उमेश लोखंडे, गजानन काकडे यावेळी सत्कारप्रसंगी उपस्थित होते, सरपंच निवडीसाठी इसापूर, मेंढी – खानापूर येथील रहिवासी रुपरावजी ढोक, विठ्ठलराव राऊत, राजेंद्र राऊत, रामभाऊ यावले, रमेश चौधरी, किशोर राऊत, प्रभाकर राऊत, मंगेश ऊज्जेनकर, नीलकंठ चौधरी, रामदास चौधरी, सुरेंद्र मोहोड, अविनाश गाडगे, संजय चौधरी, प्रभाकर चौधरी, बाळासाहेब जिचकार, अशोक ठाकरे, मंगेश ठाकरे, रमेश उईके, वासुदेवराव राऊत, जोहरीलाल परतेती, संजय ढोक, महेश वाघ यांनी मोठे परिश्रम घेतले, या निवडीमुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला होता.