*दोन दिवसाच्या बैठकीत होणार लोकपाल आंदोलनाची तारीख जाहीर*

0
794
Google search engine
Google search engine

प्रतिनिधि – उमेर सय्यद / राळेगण सिद्धी-

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल आणि लोकायुक्त साठी कॉँग्रेस सरकारच्या काळात आंदोलन केले होते त्यावेळी लोकपाल प्रस्तावावर तत्कालीन राष्ट्रपति यांनी स्वाक्षरी देखील केली मात्र त्यानंतर देशात भाजपा ची सत्ता आली ! भाजपा सत्तेत येण्यापूर्वी लोकपालची अंमलबजावणी करून लोकपाल पारित करण्याच आश्वासन दिले होते मात्र भारतीय जनता पक्षाची सत्ता केंद्रात आणि राज्यात येवून देखील लोकपालची अंमलबजावणी होत नसल्याने अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा दील्ही येथील जंतरमंतर वर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे ! त्या आंदोलनाची दिशा ठरविन्यासाठी आज रालेगण सिद्धी मध्ये देशातील मोजक्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून ही बैठक आज म्हणजे 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी पर्यंत होणार आहे आणि 8 तारखेच्या बैठकी अंती दील्ही येथे कधी आंदोलन करायचा याची तारीख जाहीर होणार असल्याची प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली आहे