बोगस बियाणे व विषारी रसायने यांच्यावर तात्काळ बंदी घालुन न्यायालयीन चौकशी करा – आम आदमी पक्षाची प्रशासनाकडे मागणी

0
695
Google search engine
Google search engine

*कीटकनाशक विषबाधा प्रकरण खुप वेदनादायी व गंभीर*

आम आदमी पार्टी चे प्रतिनिधी यांनी यवतमाळ येथे जिल्हा रुग्णालयाला दि 05-10-17 रोजी प्रत्यक्ष भेट घेवुन पाहणी केली
विषबाधा होण्याचे प्रकार लक्षात घेता प्रशासनाने त्वरीत उपाययोजना केलेली नसल्याने दिवसागणित मृत्युचा आकडा वाढत चाचला आहे 19 जणांचा मृत्यु व 700 च्यावर विषबाधा झाली व अनेक जणांचे उपचार सुरु आहे शासकिय रुग्णालयात भेट घेतली असता काही रुग्णांना बाहेरुन औषध आणावे लागले, शेतकरी कुटुंबियांकडे पैसे नसल्यामुळे सुद्धा त्यांचा मृत्यु झाला आहे
आकडा कमी दिसावा म्हणुन काही रुग्णांची नोंद केली गेली नाही, याचा अर्थ प्रत्यक्षात मात्र आकडे जास्त आहेत
एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण भर्ती होत आहे याची रुग्णालय प्रशासनाने इतर विभागाला उशिरा कळविल्याने शेतकरी मृत्युचे प्रमाण वाढले आहेत

बोगस बियाणे व रसायने यांच्यावर तात्काळ बंदी घालुन न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी आम आदमी पार्टी अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी यांनी प्रशासनाला केली आहे

यावेळी डॅा अलिम पटेल, डॅा रोशन अर्डक ,अशोक वानखडे व किरण गुडधे पदाधिकारी यांनी येथील जिल्हा रुग्णालयाचे डिन डॅा राठोड यांच्याशी चर्चा केली व त्यांच्याकडुन माहिती घेण्यात आली त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मागील वर्षी सुद्धा 170 रुग्ण भरती झाले असता 05 रुग्णाचा मृत्यु झालेला होता यावर्षी हे प्रमाण जास्त आहे व यासाठी पाच दक्षता पथक निर्माण रुग्णाचा उपचार सुरु आहे प्रशासनाला रोजनिशी दिली जात आहे तसेच यवतमाळ येथील निवासी जिल्हाधिकारी श्री फुलझेडे यांची भेट घेवुन प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या याचे लेखी स्वरुपात जाब प्रशासनाला मागितला आहे.