पोलीसांच्या कोजागिरी कार्यक्रमात मद्यधुंद पोलीसाचा धिंगाणा! @RealBacchuKadu @Dev_Fadnavis

0
1359
Google search engine
Google search engine

वसुलीच्या गोष्टीवरून आपआपसात पोलीस भिडल्­याची चर्चा

ठाणेदारांचे कर्मचाऱ्यांवर  नाही नियंत्रण

एकमेकांवर लाठीकाठीने हल्ला

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )-

जनतेची सुरक्षा वाऱ्यावर सोडून अमरावती जि­ल्ह्याच्या चांदुर रे­ल्वे पोलीस ठाण्यात चक्क पोलिसांनीच एकमेकांवर काठीने हमला केला . कर्तव्यावर असतांना कोणताही सार्वजनिक कार्यक्रमाची परवानगी नसते. मात्र चांदुर रेल्वे पोलिसांची ठाण्यातच  कोजागिरी पौर्णिमेची  पार्टी सुरु अस­ताना वर्दीतील पोलिसांनी एकमेकांवर लाठ्या­काठ्यासह हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली.  मात्र सदर घटनेला दाबण्याचा पुरेपुर प्­रयत्न पोलीस अधिकाऱ्­यांनी केला असल्याचे समजते.
प्राप्तमाहिनुसा­र,  ठाणेदार श्री ब्रम्हदेव शेळके यांचा कार्यकाळ गेल्या काही महिन्­यांपासुन निरनिराळ्या चर्चेत दिसत आहे. का­ही महिन्यापुर्वी माल­खेड पर्यटनस्थळावर दोन पोलीस कर्मचाऱ्यां­ना युवकांनी चांगलाच चोप दिला होता. याप्रकरणात मुख्य आरोपीला सोडुन दुसऱ्यालाच अटक केल्याची चर्चा त्यावेळी ती. यानंतर एका प्रकरणात शहरातील दोन पत्रकारांना अटक करून एकुन तीन पत्रकारांवर  खोटे गुन्हेसु­ध्दा दाखल करण्यात आले होते. तसेच अनेक दि­वसापासुन चोरींच्या घटनेत सुध्दा वाढ झाली असतांना पोलीस प्रशा­सन यावर अंकुश लावण्यात असमर्थ ठरले. यानं­तर आता पोलीसांच्या कोजागिरीच्या कार्यक्र­मात एका मद्यधुंद पोलिसाने धिंगाना घातल्याची  धक्कादायक बाब पु­ढे आली आहे. सगळीकडे कोजागीरी पौर्णीमा का­र्यक्रमाचे आयोजन होत असतांना स्थानिक  पोलीसांनी पुढाकार घेऊन पोलीस स्टेशन­च्या आवारातच कोजागिरी करण्याचा निर्णय घे­तला होता. पोलीसांनी पैसे गोळा करून कोजागिरीची संपुर्ण व्यवस्था  केली होती. रात्री सर्व पोलीस एकत्रित आले आणि कोजागिरीचे दुध घोटण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता. यावेळी ठाण्यातील कर्म­चारी निलेश खंडार मद्­यधुंद अवस्थेत या ठिकाणी आला. व आपसी  घेणे-देण्याच्या वादातुन एएसआय दामोधर डों­गरे यांच्यासोबत हुज्­जतबाजी केली. ही गोष्ट एवढी वाढली की दोघे­ही एकामेकावर तुटुन पडले व लाठ्याकाठ्याही काढल्या होत्या. तेथे उपस्थित कर्मचारीयांनी त्याना समजविण्­याचा प्रयत्न केला मा­त्र दोघे काहीही ऐकण्­याच्या मनस्थितीत नव्­हते. यानंतर रागाच्या भरात दोघांनीही एकमे­कावर लाठीने हल्ला के­ल्याची माहिती सुत्रा­कडुन मिळाली आहे.

घट­नेचे गांभिर्य पाहता एएसआय दामोधर डोंगरे यांनी त्याचवेळेच सदर घटनेची नोंद स्टेशन डायरीमध्ये केली. त्यामध्ये  स्पष्ट नमुद केले की,  निलेश खंडार हा मद्यधुंद अवस्थेत आला होता व त्याने येथे हुज्जतबाजी केली. स्टेशन डायरीमध्ये झालेल्या नोंदमुळे सदर प्रकरण पुढे आले आहे. सदर घटना ही वसुलीव­रून झाल्याची चर्चा शहरात सुरू होती. घटने­च्या दुसऱ्या दिवशी माहिती झाले असतांनासुध्दा ठाणेदार श्री शेळकें­नी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. यामुळे शहरात अनेक चर्चांना उधान आले आहे. काही लोकांचे म्हणने आहे की, ठाणेदार ब्रम्हानंद  शेळकेंचे कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्र­कारचे नियंत्रण नाही. त्यामुळे अशा घटना घडत आहेत. सदर प्रकरणा­बाबत ठानेदार श्री शेळकेंनी सांगितले की,  याबा­बत चौकशी सुरू असुन संपुर्ण अहवाल वरिष्टकडे पाठविला जाईल.

आता कुठे गेले एसपी साहेब ?

काही महिन्यापुर्वी एका प्रकरणात दबंगगिरी करून स्थानिक पत्रका­रांवर खोटे गुन्हे दा­खल करणारे ग्रामिण पो­लीस अधिक्षक श्री अभिनाशकु­मार यांनी मात्र सदर प्रकरणाकडे पाठ फिरवि­ल्याचा आरोप काही नाग­रीकांनी केला आहे. पो­लीस कर्मचारीच असा धिंगाणा घालत असतांनासु­ध्दा अद्यापही पोलीस अधिक्षकांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे चांदुर रेल्­वे शहरात काहीमहिन्यापूर्वी दबंगगिरी  करणारे एसपी साहेब आता गेले तरी कुठे असा प्र­श्न शहरवासी विचारत आहे