भविष्यात पेट्रोल केवळ ३० रूपये लिटर दराने मिळणार – अमेरिकेतील उद्योगपती आणि भविष्यवेत्ते टोनी सेबा

0
552
Google search engine
Google search engine

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी )

 सध्या पेट्रोलचे दर प्रतिलीटर ८० रूयांच्या आसपास आहे. मात्र नजीकच्या काळात ते केवळ ३०रूपये किंवा त्यापेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. नवीन तंत्रज्ञान आणि अपारंपारिक ऊर्जा साधनांच्या विकसनामुळ पेट्रोलवरील इंधनासाठी अवलंबून राहणे कमी होईल. त्यामुळे पेट्रोलच्या मागणीत घट होऊन परिणामी किमतही घसरेल. असा दावा अमेरिकेतील उद्योगपती आणि भविष्यवेत्ते टोनी सेबा यांनी केला आहे. टोनी यांनी काही वर्षापूर्वी जगभारत सौऊर्जेच्या मागणीत आणि निर्मितीत वाढ होण्याची भविष्यवाणी केली होती.ही भविष्यवाणी काही प्रमाणात का होईना खरी ठरली आहे. ज्यावेळी टोनी यांनी दावा केला होता, त्यावेळी सौरउर्जेवरील उपकरणांची आणि निर्माण होणाऱया उर्जेच्या किंमती आजच्या दहापट होत्या. सिलीकॉन व्हॅलीमध्यश उद्योजक म्हणून कार्यरत असणारे सेबा उद्योजकता आणि पर्यावरणपूरक उर्जेचे प्रचारक आहेत.