अंबाडा येथे शिवार सवांद यात्रेला उत्फूर्त प्रतिसाद-*भाजपचे शेतकऱ्यांशी थेट संपर्क म्हणजे सवांद यात्रा होय ~ डॉ अनिल बोंडे*

0
916
मोर्शी 
: शेतकऱ्यांशी थेट संपर्क होऊन त्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी भाजप सरकारने शिवार संवाद यात्रेचा कार्यक्रम हाती घेतला आहे, आज तालुक्यातील अंबाडा जिल्हा परिषद सर्कलमध्ये गुरुवार दिनांक २५ मे 2017 रोजी शिवार संवाद यात्रेचे आयोजन मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. अनिल बोन्डे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थितीती होती. यावेळी आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी शेतकऱ्यांसोबत सवांद करतांना त्यांनी भाजपा सरकारच्या फलश्रुतीची माहिती दिली. भाजपाची शिवार सवांद यात्रा म्हणजेच भाजप सरकारचा शेतकऱ्यांशी थेट संपर्क होय, या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या निकाली काढण्याचे काम हि योग्यरीतीने भाजप सरकारकडून होत आहे. असे हि ते म्हणाले.
यावेळी डॉ.वसुधाताई बोंडे, जिल्हा परिषद सदस्य सारंग खोडस्कर, प.स.सदस्य रमेश खातदेव, भाजपाचे तालुकाध्यक्ष अजय आगरकर, अंबाडा गावचे सरपंचा सुलोचना कंगाले मुरलीधर पिसे, जुबेर पटेल, दीपक घाटोळ, रवी कोकरे, सतीश बीरे, हर्षल भोजने, अनिरुद्ध तडस, सागर तडस, नंदू खोबरे, अंकुश अळसरे, सारंग शिरभाते, काशिनाथ विश्वकर्मा यांच्यासह आदी मान्यवर व शेतकरी – शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.