युवकाची गळफास लावून आत्महत्या

0
580



चांदूर रेल्वे / शहेजाद खान /-

तालुक्यातील सोनगाव येथील ३३ वर्षीय युवकाने राहत्या घरी छताला गळफास लावून
आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री दहा वाजता घडली.राहूल विनायक सराड असे त्या
युवकाचे नाव आहे.
घटनेच्या रात्री घरी एकटाच असतांना त्याने छताला गळफास लावून आत्महत्या केली. ही
बाब शेजारच्या लक्षात आली. मृतक राहूलची आई मुलीच्या गावी गेलेली होती. तो घरी
एकटाच राहत होता. त्याचे आत्महत्या करण्यामागील कारण मात्र कळू शकले नाही. राहूल
शिवसेनेचा कार्यकर्ता होता. त्याच्या पश्चात आई व विवाहीत बहिण,जावई आहे.