सर्व विभागांनी मान्सूनपूर्व दक्षता घेण्याचे निर्देश पावसाळ्यामुळे नागरिकांचे कुठलेही नुकसान कामा होता नये – पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील

0
583
Google search engine
Google search engine
अमरावती-
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पूरपरिस्थिती नियंत्रण, साथ रोग नियंत्रण यासाठी कार्यक्रम राबविताना सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवावा. शेतकरी, ग्रामस्थ, विशेषकरुन दुर्गम भागातील रहिवाशी आदी नागरिकांचे कुठलेही नुकसान होता कामा नये, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे दिले.
जिल्हा प्रशासनातर्फे मान्सूनपूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजित बांगर, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस अधिक्षक अभिनाश कुमार, महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अरुण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवावा, असे सांगून श्री. पोटे-पाटील म्हणाले की, नदीकाठच्या गावांत पूरपरिस्थितीची शक्यता लक्षात घेता तिथे आवश्यक व्यवस्थापनाची पूर्वीच दक्षता घ्यावी. धरणाचे पाणी सोडतानाही काळजी घेतली पाहिजे. वीजेच्या तारा कोसळून जनावरे दगावण्याचे प्रकार घडतात. ते घडू नयेत असा प्रयत्न करावा. दुर्देवाने असे प्रकार घडल्यास शेतक-यांना महावितरणकडून तत्काळ मदत मिळाली पाहिजे.
सर्व विभागांनी संपर्क यंत्रणा मजबूत ठेवावी. लोकांना वेळेत व योग्य माहिती मिळावी यासाठी विविध माध्यमांचे सहकार्य घ्यावे. पूरपरिस्थितीत यापूर्वी चांगले काम केलेल्यांना प्रशस्तीपत्र देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.