*चण्या बेग टोळीतील शार्पशुटर नाशकात जेरबंद तर 2 पिस्टल सह 40 काडतुस जप्त*

0
1526
Google search engine
Google search engine

नगर -उमेर सय्यद / –

 

 

अहमदनगरमधील कुविख्यात चन्या बेग टोळीतील गुंड व खतरनाक शार्पशूटर तथा न्यायालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला शाहरूख रज्जाक शेख व त्याच्या दोन साथीदारांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा व नाशिक शहर पोलीसांनी सापळा रचत पाथर्डी फाटा परिसरातून जेरबंद केले़ या तिघांकडून दोन विदेशी बनावटीची पिस्तूल, ४० जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहे़ शहरात मोठे कांड करण्याचा कट या तिघांनी रचला होता मात्र त्यांना वेळीच जेरबंद करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे़
पाथर्डी परिसरातील विक्रीकर भवनच्या पाठीमागे असलेल्या पार्वती अपार्टमेंटच्या तिसºया मजल्यावर अहमदनगर पोलिसांच्या रेकॉर्डवरील तसेच मोक्कातील सराईत गुन्हेगार शाहरुख रज्जाक शेख व सागर सोना पगारे हे दोघेजण असल्याची माहिती अहमदनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांच्याशी चर्चा केल्यानंतर नाशिक शहर पोलीस व कमांडो यांनी इमारतीला वेढा घातला़
सराईत गुन्हेगार हे पार्वती अपार्टमेंटच्या तिसºया मजल्यावरील रमेश सावंत यांच्या फ्लॅट नंबर १३ मध्ये राहत असल्याचे समोर येताच काही पोलिसांनी इमातीच्या जिन्यातून तर काही जणांनी शिडीचा वापर करून फ्लॅटच्या गॅलरीत प्रवेश केला़ पोलिसांनी फ्लॅटमध्ये प्रवेश करताच सराईत गुन्हेगार शाहरुख शेख व बारकु सुदाम अंभोरे या दोघांना झडप घालून जेरबंद केले़ यानंतर बेडरूममध्ये असलेल्या सागर पगारे यास पकडण्यासाठी दरवाजा तोडला असता पगारेने पोलिसांवर पिस्तुलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला मात्र तत्पुर्वीच कमांडो पथकाने जडप टाकून त्यास ताब्यात घेतले़

पाथर्डी फाटा परिसरातील पार्वती अपार्टमेंटमध्ये पहाटे चार ते सकाळी नऊ वाजेपर्यंत पोलिसांची ही मोहिम सुरु होती.
दरम्यान, हे सराईत गुन्हेगार शहरात कोणत्या उद्देशाने राहत होते, त्यांनी घरफोड्या वा गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलिसांकडून केला जातो आहे़ ऐन दिवाळीत पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे़ तर
गत वर्षभरापासून अहमदनगर पोलीस कुख्यात गुन्हेगार शेख व त्याच्या साथीदारांच्या मागावर होते़ त्यानुसार शेखसह त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून दोन विदेशी पिस्टल, ४० काडतुसे, चार मोबाईल व पासिंग न झालेली दुचाकी जप्त केली आहे़