*खामगाव शेड्युल बँकेने कँशलेश व्यवहारात ठेवले यशस्वी पाऊल* *अचलपूर शाखेने वितरीत केली पहिली स्वाईप मशीन*

0
1332
अचलपूर / श्री प्रमोद नैकेले  /-
सहकारी बँक क्षेत्रात येणा-या खाजगी बँकांमध्ये खामगांव अर्बन कौ-आँप.बँक नेहमीच अग्रगन्य राहिली आहे.आज भारताचे प्रधानमंत्री यांचे कँशलेश व्यवहाराचे आवाहन स्वीकारून अत्याधुनिकतेकडे आपले एक पाऊल टाकले आहे.
     खामगाव अर्बन बँक ही शेड्युल बँक होवून बरेच दिवस झाले.आपल्या त्वरित सेवा व ग्राहकांचे समाधान या तत्वावर चालून खाजगी क्षेत्रात ही  बँक ग्राहकांच्या विश्वासात खरी ऊतरली आहे.स्वच्छ प्रशासन व त्वरित सेवा हेच ध्येय ठेवून वाटचाल करणा-या खामगाव बँकेच्या अचलपूर शाखेने अत्याधुनिकतेकडे चाहुल करीत कँशलेश व्यवहारात पदार्पन केले.या शाखेने दि.१८ मे २०१७ रोजी  शाखेचे ग्राहक “चेडे एन्टरप्रायजेस” यांना  MPOS SWIPE MACHIN चे वितरण केले.याप्रसंगी अचलपूर शाखाव्यवस्थापक अशाेक म गाराेडी, प्रकाश बाविसकर, अमाेल सवई व समीर विजयराव पतकी यांनी चेडे एन्टरप्रायजेस चे संचालक निलेश चेडे यांना स्वाईप मशीन वितरीत केली. खामगाव बँकेच्या आज पर्यंतचा प्रवास हा असाच यशस्वीपणे चालत आला यावेळी येथील  विजय धोटकर यांनी सांगितले की विदर्भ अर्बन को-आँप बँक असोसिएशन तर्फे खामगाव बँकेला प्रथम पुरस्कार सतत तीन वर्षांपासून प्राप्त होत आहे हा आमच्या ग्राहकांची आम्हाला मीळालेली साथ आहे.१९८९ मध्ये अचलपूर शाखेची स्थापना झाली व आज शेकडो ग्राहकांच्या आर्शीवादाने व आमच्या व्यवस्थापक मंडळाचे सहकार्याने आम्ही यशस्वी वाटचाल करीत आहोत असे शाखा व्यवस्थापक अशोक गारोडी यांनी आपल्या मनोगतात सांगीतले.