चांदुर  शहरातील वाहतुकीचे तीन – तेरा – अतिक्रमण जैसे थे वाहतूक कर्मचारी दिसतात फक्त ट्रॅफिक नसलेल्या रस्त्यावर

0
1390
Google search engine
Google search engine

ठाणेदार श्री साळुंखे घेणार का दखल

चांदुर बाजार / बादल डकरे –

चांदुर बाजार हे तालुक्याचे ठिकाण असल्याने या तालुक्याला अनेक लहान मोठे ग्रामीण भाग जोडले आहे नेताजी चौक ते जयस्तंभ आणि टोम्पे महाविद्यालय ते जयस्तंभ चौक वरून जो रोड चांदुर बाजार शहराच्या बाहेर पडतो त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते.
दिवाळीच्या अगोदरच्या च्या दिवशी चांदुर बाजार येथील वाहतूक कर्मचारी मामाजी मेडिकल समोर आपल्या खाजगी गाडीवर बसले होते मात्र त्यांना ट्रॅफिक जमा झाली याची माहिती नव्हती का?यांच्या वर कार्यवाही कोण करणार तसेच चांदुर बाजार येथील आठवडी बाजार हा रविवारी असतो त्यामुळे वाहतूक कर्मचारी हे केवळ ब्राम्हणवाडा थडी च्या टी पॉइंट वरच दिसतात.मात्र शहरातील मुख्य समस्या असणाऱ्या वाहतूक महत्त्वाची नाही का?कारण बाजाराचा दिवस असल्याने मोठया प्रमाणात गर्दी चांदुर बाजार तालुक्यात पहावयास मिळते.
पोलीस स्टेशन च्य मागच्या बाजूला खाजगी बसेस तसेच कालिपिली या मुळे ही रस्त्यावरील वाहतूक मोठया प्रमाणात अधडला निर्माण होत आहे.काली पिली मालक आपली गाडी रोडच्या मध्य भागी लावत असल्याने आणि खाजगी बसेच च्य दोन्ही बाजूला उभे राहत असल्याने वाहतुकीला मोठ्या प्रमाणात खीळ बसत आहे.काही अपघात झाल्यास याची जबाबदारी कोण घेणार अशा ही प्रश्न आता समोर उभा राहत आहे.
चांदुर बाजार येथील वाढत्या अतिक्रमण विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देताच अतिक्रमण तर काढले मात्र फक्त 4 ते 5 तासकरिता पुन्हा अतिक्रमण जैसे थे झाल्याचे चित्र चांदुर बाजार येथील मुख्य रस्थावर पहावयास मिळते.
त्यामुळे वाढलेल्या अतिक्रमण नगर परिषद काढेल का?ठाणेदार साळूके आपला पोलीस स्टेशन मधील मुक्काम सोडून बाहेर पडतील का हे पाहणे गरजेचे आहे.