*धार्मिकते सोबत सामाजिक कर्तव्य भावनेतुन बालाजी उर्फ व्यंकटेश संस्थान येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न*

0
743

अचलपुर / श्री प्रमोद नैकेले/-

-*दानात दान रक्तदान* आजच्या बदलत्या परिस्थिती मध्ये विविध आजार व वाढते अपघात पाहता रुग्णांना उपचारादरम्यान रक्ताची गरज भासते व शासकीय रक्तपेढीतून ते मीळावे अशी प्रत्येकाची इच्छा असते मात्र शासकीय रक्तपेढी जिल्हा सामान्य रुग्णालयात असून तेथून जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या स्टोरेज ला नियमित रक्तपुरवठा करावा लागतो शिवाय जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज शेकडो गरीब रुग्ण येतात त्यांना सुध्दा रक्त पुरवठा करणे आवश्यक असते या सर्व कारणाने शासकीय रक्तपेढीतील रक्त साठा दिवसेंदिवस कमी होत आहे म्हणून ही कमतरता दुर व्हावी या उद्देशाने स्थानीक श्री बालाजी उर्फ व्यंकटेश संस्थान महाविरपेठ सुलतानपुरा येथे आज 25 आक्टोंबर रोजी भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले.
याप्रसंगी बोलतांना संस्थान चे अध्यक्ष व रुग्ण मित्र विनय चतुर यांनी सांगितले की आम्ही धार्मिकते सोबतच सामाजिक कर्तव्याची भावना जपली पाहिजे हाच उद्देश ठेवून आमच्या संस्थान चे सर्व पदाधिकारी यांनी शासकीय रक्तपेढी जिल्हा सामान्य रुग्णालय यांचे टीमला आमंत्रित करून हे रक्तदानाचे शिबीर घेतले याप्रसंगी जवळपास 30 बाँटल्स रक्तदान परिसरातील स्त्री पुरुष मंडळींनी केले.या कार्यक्रमाला सरमसपुरा पोलीस स्टेशन चे ठानेदार अभिजित अहिरराव शांतता समिती सदस्य रमाकांत शेरकार,कँप्टन वानखडे,विलास केचे व समाजसेवक विलास बेलसरे प्रामुख्याने उपस्थीत होते त्यांचे हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.संस्थान चे सर्व पदाधिकारी तसेच शहरातील गणमान्य नागरीक युवावर्ग मोठया संख्येने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सहकार्य केले