दुरांतोचे इंजिन घसरले – अपघाताची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करण्यात येणार

0
888

सावंतवाडी – कोकण रेल्वे मार्गावर धावणा-या ‘दुरांतो’ एक्सप्रेसचे इंजिन रुळावरून घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक सुमारे ६ तास ठप्प झाली. केरळ एर्नाकुलम ते मुंबई कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस असा प्रवास करणा-या या एक्सप्रेस गाडीला मळगावस्थित सावंतवाडी रोड स्थानक ते झाराप पत्रादेवी दरम्यान नेमळे-पाटकरवाडी येथे गुरुवारी दुपारी २.४५ च्या सुमारास हा अपघात झाला. नव्या रेल्वे ट्रॅकच्या जोडणीचे काम सुरू असताना रेल्वे ट्रॅकवर नव्या ट्रॅकचा काही भाग चढल्याने झालेल्या या अपघातात केवळ दैव बलवत्तर म्हणून गाडीतील सुमारे ४०६ प्रवाशांचे प्राण वाचले.