स्वाभिमानीचा मोर्चा आमदाराच्या निवासस्थानी फिरकलाच नाही- .भाजपाच्या महिलांनी आदरातिथ्याची केली होती तयारी.

0
515
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काल बुधवार रोजी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांच्या वरुड येथील निवासस्थानापासून रुंग्ने मोर्चा निघणार होता, आमदारांच्या धर्मपत्नी डॉ.वसुधाताई बोंडे व भाजपाच्या शेकडो महिला आदरातिथ्यसाठी हजर असल्याची चाहूल लागताच स्वाभिमानीचा मोर्चा आमदाराच्या निवासस्थानी फिरकलाच नसल्याने तुरळक आलेल्या मोर्चेकरांची मोठी तारांबळ उडाली होती. यावेळी शेकडो भाजपा महिलांनी आमदार यांच्या निवासस्थानी येणा-या मोर्चेकरांसाठी अल्पउपहाराची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती. परंतु आपल्या राजकीय स्वार्थासाठी कुठलाही व्यक्ती शेतकरी बांधवांची दिशाभूल करो, परंतु आम्ही नेहमीच शेतक-यांच्या सोबत आहोत आणि राहणार. शेतक-यांची दिशाभूल करणा-या व्यक्तीला त्याची जागा आज शेतकरी-शेतमजूर बांधवांनी दाखवून दिली. आमचे शेतकरी बहिण-बांधव दैनदिन  शेकडोच्या संख्येने आमच्या घरापर्यंत समस्या व मार्गदर्शनासाठी येत असतात आम्ही नेहमीच आदरातिथ्य व सन्मान करत असतो. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार महोदय पुढाकार घेऊन निकाली काढत असतात असे मत हि आदरातिथ्याच्या प्रसंगी डॉ.वसुधाताई बोंडे यांनी बोलतांना व्यक्त केले.
यावेळी वरुडच्या नगराध्यक्षा स्वाती आंडे, प.स.सदस्या व भाजपा महिला तालुकाध्यक्ष अंजली तुमराम, प.स.सदस्या ललिताताई लांडगे, चैताली ठाकरे, भाजपा शहराध्यक्षा निशा पानसे, न.प.सभापती नलिनी रक्षे, .पुष्पा धकीते, नगरसेविका रेखा काळे, मंदा आगरकर,  शुभांगी खासबागे,  छाया दुर्गे,  सुवर्णा तुमराम, अर्चना आजनकर,  भारती माळोदे, शेघाट नगरसेविका नीलिमा कांडलकर, रेखा अढाऊ, जयाताई श्रीराव, मंदा वसुले, मोनिका भोंगाडे, सारिका बेलसरे, हर्षा घोरपडे, सुनीता वंजारी, माजी जि.प.सभापती अर्चना मुरुमकर, शेघाट माजी नगराध्यक्ष सरिता खेरडे, पं.स माजी सदस्य  रोशनी  क्षीरसागर, सुनिता डहाके, मनीषा मानेकर, सपना कोहळे, शालिनी चोबितकर, जया श्रीखंडे, वैशाली मोरस्कर, सुशीला ढोले, बबिता बेलगे, अश्विनी खोडे, दिपाली बोंद्रे, माया बासुंदे, नीलिमा शाहू,गीता शर्मा, सुलोचना चव्हाण, सुनिता उंबरकर, नंदा देशमुख, कुसुम राउत, कविता बेले, रमाबाई ढोले, रंजना हरले, रंजना पांडे, सरोज हरले, अरुणा हरले, कुसुम धुर्वे, कमल तडोकर, सुमन देशमुख, मेघा कवटकर, रंजना पांडे, रेखा पांडे, मंगला पांडे, सुभाष गोरडे, किशोर भगत, धनराज अकर्ते, नरेंद्र बेलसरे, संतोष निमगरे, बाळू मुरुमकर, रामा खोडे, नितीन श्रीराव, बाबाराव पांडव, बंडू काळे, शंकरराव चौबीतकर, प्रशांत गणोरकर यांच्यासह शेकडो भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.