*श्री अवधुत भजन मंडळ अचलपुर यांची श्री क्षेत्र सांवगा येथे निघणार पायदळ वारी*

0
1094

अचलपुर / श्री प्रमोद नैकेले/-

श्री अवधुत भजन मंडळाने यावर्षी प्रथमच श्री क्षेत्र सांवगा पायदळ वारीचे आयोजन केले आहे.
अचलपूर येथील श्री अवधुत भचन मंडळ १ नोव्हेंबर रोजी बेगमपुरा येथून श्री क्षेत्र सांवगा विठोबा ता.चांदुर रेल्वे येथे पायदळ वारी करिता रवाना होत आहे.यावर्षी त्यांची ही पहिलीच वारी असून श्री क्षेत्र सांवगा येथे ४ नोव्हेंबर ला ही वारी पोहचेल असे भजन मंडळाचे सुरेश कवठाळे,सारंग माहोरे,सचिन इंगळे,अभिजित इंगळे,गोपाल काकडे,गणेश गाडगे,सुरेश भोजापुरे,गजानन गुल्हाने,अमोल माहोरे व अन्य सदस्यांनी सांगीतले.