राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – दैवेश रेडकर, हिंदु जनजागृती समिती

0
546
Google search engine
Google search engine

दोडामार्ग – इस्लाम खतरे में है ।, असे म्हटल्यावर मुसलमान एकत्र येतात. ख्रिस्तीसुद्धा त्यांच्या धर्मावरील आघातांच्या विरोधात मतभेद विसरून एकत्र येतात; परंतु जेव्हा हिंदु धर्मावर संकट येते, तेव्हा हिंदू मात्र आपले पद, पक्ष, संघटना, संप्रदाय, मतभेद विसरून एकत्र येत नाहीत. त्यामुळे हिंदूंची संघटनात्मक शक्ती न्यून झाल्याने राष्ट्र आणि हिंदु धर्म यांवर आघात होतात. हे थांबवायचे असेल, तर सर्व हिंदूंनी देव, देश आणि धर्म यांवरील आघात रोखण्यासाठी सर्व मतभेद विसरून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी एकत्र येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. दैवेश रेडकर यांनी केले.

दोडामार्ग तालुक्यातील सरगवे पुनर्वसन, झरे-२ येथील श्री खंडोबा सभागृहात २९ ऑक्टोबरला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभा झाली. या सभेचा प्रारंभ होण्यापूर्वी सभागृहाच्या समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला येथील नवनिर्वाचित सरपंच श्री. देवेंद्र शेटकर यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला.

श्री. रेडकर पुढे म्हणाले, अन्य धर्मियांना त्यांच्या प्रार्थनास्थळी धर्मशिक्षण दिले जाते. त्यामुळे ते धर्माशी एकनिष्ठ असतात. हिंदूंची मंदिरेसुद्धा धर्मशिक्षण देणारी केंद्रे आहेत; परंतु आज अशी परिस्थिती दिसून येत नाही. यासाठी सर्व हिंदूंनी पुढाकार घेऊन धर्मशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. दैनिक सनातन प्रभातच्या माध्यमातून सर्व हिंदूंना राष्ट्र आणि धर्म यांविषयी मार्गदर्शन केले जाते, तसेच धर्मशिक्षण दिले जाते. यासाठी सर्व हिंदूंनी सनातन प्रभातचे वर्गणीदार व्हावे.