भदोही (उत्तरप्रदेश) येथे अज्ञातांकडून स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची तोडफोड

32

भदोही (उत्तरप्रदेश) – येथील नयीबाजार मार्गावर असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. मूर्तीचे शीर तोडल्याचे दिसत आहे. यानंतर मोठ्या संख्येने हिंदूंनी रस्ताबंद आंदोलन केले. हिंदूंनी नवीन पुतळा बनवण्यासह आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी या प्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा तरुण मनोरुग्ण आहे. त्याने कुटुंबाशी भांडण करून तो घराबाहेर पडला होता.

सदर चित्र प्रसिद्ध करण्यामागे धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसून वाचकांना स्थिती लक्षात यावी हा उद्देश आहे.