सावंगी मग्रापुर, मांजरखेड तलावातून गाळ काढण्याच्या कार्यक्रमाला शुभारंभ – एसडिओ ललित वऱ्हाडे व तहसीलदार राजगडकर हस्ते शुभारंभ

0
764
Google search engine
Google search engine

गाळमुक्त तलाव,गाळयुक्त शिवार योजना

चांदूर रेल्वे / शहेजाद खान –

गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर
व मांजरखेड दानापूर येथील गाव तलावातून गाळ काढण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ चांदूर
रेल्वेचे उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे  व तहसीलदार राजगडकर यांच्या हस्ते करण्यात
आला.
यावेळी सावंगी मग्रापूर येथील सरस्वती तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ उपविभागीय
अधिकारी ललित वऱ्हाडे  यांच्या हस्ते जेसीपीचे पूजनाने करण्यात आला.यावेळी तहसीलदार
बि.ए.राजगडकर, नायब तहसीलदार राठोड, मंडळ अधिकारी इंगळे, एस.एस.लंगडे, तलाठी
दीपाली जाधव, मुकुंद  सुडके सह शेतकरी आरेकर, गोडबोले, शेळके उपस्थित होते. त्याच
प्रमाणे तालुक्यातील मांजरखेड दानापूर येथील गाव तलावातून गाळ काढण्याच्या कार्यक्रमाचा
शुभारंभ उपविभागीय अधिकारी ललीत वऱ्हाडे  व तहसीलदार राजगडकर यांच्या हस्ते पुजन
करून करण्यात आला. याप्रसंगी मांजरखेड दानापूर सरपंच रामदास सुकरे, उपसरपंच लता
सोनटक्के, पोलीस पाटील दिनेश गायकवाड, मुन्ना मुंधडा यासह सर्व ग्रा.पं.सदस्य व गावकरी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.