गोंडवाना राज्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा

0
551

चंद्रपूर/-

चंद्रपुरात हजारो वर्षांपासून गोंडवानाचे गडकिल्ले असून येथे हजारो वर्ष गोंड राज्याची राजवट होती. मात्र एकीकडे विदर्भ राज्याची मागणी करत असताना गोंडवाना राज्य का नाही ? असा प्रश्न करत गोंडवाना राज्याच्या मागणीसाठी आज राज्यस्तरीय गोंडवाना संग्राम परिषेदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात शेकडो आदिवासी बांधव उपस्थित होते.
गोंडवाना राज्य,गोंडवाना भूमी त्यांचा इतिहास जिवंत राहावा,गोंडकालीन गडकिल्ले,धार्मिक स्थळ जिवंत राहावे त्याचे अस्तित्व मिटू नये,राजा शंकरशाह,रघुनाथ शाह,वीर बाबुराव शेडमाके १८५८ च्या स्वातंत्र्य युद्धात शहीद झाले.बिरसामुंडा,भिकू कुमरा,शामदादा कोलाम,तंट्या भिल असे अनेक आदिवासी शहीद झाले.देशाच्या स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्य संग्रामांना काय मिळाले ? गोंडवाना राज्य देण्याऐवजी गोंडीयन भाषिकांचे गोंडवाना राज्याचे अस्तित्व मिटविण्याचे पाप तत्कालीन राज्यकर्त्यांनी केले.असे यावेळी बोलताना विलास राऊत म्हणाले.गोंडवाना राज्याची निर्मिती लवकरात लवकर करून गोंडवाना राज्याची राजधानी नागपूर करण्यात यावी.या मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.या मोर्चात समाजबांधवांनी शेकडोच्या संख्येने आपली उपस्थिती दर्शविली होती.त्यानंतर मोर्चातील एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.