काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी कलम ३७० रहित करणे हाच एकमात्र पर्याय ! – भाजप

58

जम्मू – कलम ३७० हटवून जम्मू-काश्मीर राज्याला अन्य राज्यांसारखे एकाच स्तरावर आणणे हेच काश्मीरच्या समस्येवरील एकमात्र व्यावहारिक उत्तर आहे, असे प्रतिपादन राज्यातील भाजपचे प्रवक्ता वीरेंद्र गुप्ता यांनी केले.

गुप्ता पुढे म्हणाले की, राज्यातील आतंकवादाचे समर्थन करणार्‍या फुटीरतावादी आणि पाक यांना कलम ३७० रहित करणे हे सडेतोड उत्तर असेल. यामुळे राज्यातील लोकांना मुख्यप्रवाहामध्ये आणण्याचा मार्ग प्रशस्त होईल.

नुकतेच काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री पी. चिदंबरम् यांनी जम्मू-काश्मीरमधील लोकांकडून करण्यात येणार्‍या स्वायतत्तेच्या मागणीचे समर्थन केले. त्यावर गुप्ता यांनी टीका केली. गुप्ता म्हणाले की, काँग्रेसचे पूर्वीपासूनच हे धोरण राहिले आहे. त्यांच्या समर्थनामुळे पाकच्या आदेशाने राज्यात आतंकवादी कारवाया चालू केल्या आहेत त्या फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन मिळेल.

जाहिरात
नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।